शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

कोल्हापुरात बांधकाम कामगार गृहोपयोगी संच वाटपावेळी मोठा गोंधळ; बोलावले पाचशेंना, आले पाच हजार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 11:40 IST

उन्हामुळे एका महिलेला आली भोवळ

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने लाभार्थ्यांना गृहोपयोगी संचाचे वाटप करताना शुक्रवारी गोंधळ उडाला. पाचशे लाभार्थ्यांना बोलावले असताना जिल्ह्यातून पाच हजार लाभार्थी आल्याने रेटारेटी झाली. महिला लाभार्थी दीड-दोन तास उन्हात बसल्याने त्यातील एका महिलेला भोवळ आली तर अनेकांचा जीव कासावीस झाला होता.कामगार कल्याण मंडळाच्या वतीने लाभार्थ्यांना संसारोपयोगी कीटचे वाटप केले जात आहे. गुरुवारी त्याचा प्रारंभ झाला आणि शुक्रवारपासून जिल्ह्यात चार ठिकाणी वाटप केंद्रे सुरू करण्यात आली होती. मुस्कान लॉन येथे वाटप यंत्रणेने विविध संघटनांच्या पाचशे लाभार्थ्यांना बोलावले होते. मात्र, प्रत्यक्षात पाच हजार लाभार्थी आल्याने गोंधळ उडाला.तासभर उन्हात थांबल्यामुळे लाभार्थ्यांचा संयम सुटला आणि घुसाघुशी सुरू झाल्याने गोंधळ उडाला. उन्हामुळे त्यातील एका महिलेला भोवळ आल्याने गोंधळात आणखीनच भर पडली. शेवटी, वाटप प्रतिनिधींनी सगळ्यांना शांत करत पहिल्यांदा टोकन दिलेल्यांना पहिल्यांदा कीट दिले, त्यानंतर टोकन नसणाऱ्यांनाही वाटप केले. सायंकाळी उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती.

गोंधळाला संघटनाच जबाबदारसंघटनांना ठरवून दिवस दिले असताना काहींनी आपल्या लाभार्थ्यांना पाठवून दिल्याने गोंधळ उडाला. वाटप करणाऱ्या यंत्रणेने संबधितांना विचारले असता संघटना प्रतिनिधी, एजंटांचा निरोप असल्याने आल्याचे सांगितले.

आम्ही पाचशे लाभार्थ्यांनाच बोलावले होते, पण एजंटांनी त्यांच्या लाभार्थ्यांना पाठवल्याने हा गोंधळ उडाला. वास्तविक ६ मार्चपर्यंत हे वाटप सुरू राहणार असताना अफवामुळे गर्दी झाली. तरीही दूरवरून आलेल्या सगळ्या लाभार्थ्यांना आम्ही वाटप केल्याशिवाय बंद करणार नाही. - शोएब शेख, वाटप प्रतिनिधी 

आम्हाला आज वाटप असल्याचा निरोप मिळाल्याने आलो. सकाळपासून उन्हातान्हात बसलो आहे, लवकर वाटप केले तर घरी जाता येईल. - वैशाली सोळसे, लाभार्थी

टॅग्स :kolhapurकोल्हापूर