बांधकाम सभापतींचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:16 IST2021-07-08T04:16:39+5:302021-07-08T04:16:39+5:30
मलकापूर : सर्वसामान्य जनतेसाठी केलेले काम हे सदैव जनतेच्या मनात राहते. आपल्या माणसाचे आपणच विशेष कौतुक करायचे असते, असे ...

बांधकाम सभापतींचा सत्कार
मलकापूर : सर्वसामान्य जनतेसाठी केलेले काम हे सदैव जनतेच्या मनात राहते. आपल्या माणसाचे आपणच विशेष कौतुक करायचे असते, असे प्रतिपादन माजी आमदार सत्यजित पाटील यांनी केले. जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती हंबीरराव पाटील यांनी सभापती कालावधीत केलेल्या कार्याबद्दल शाहुवाडी पंचायत समिती येथे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
माजी सभापती हंबीरराव पाटील म्हणाले की, नेतृत्वाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवून सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू मानून काम केले. कोरोनासारख्या भीषण संकटात आरोग्य सेवा देण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे समाधान आहे. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी, सभापती विजय खोत, अमर पाटील, डॉ. स्नेहा जाधव, आदींनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात प्रारंभी माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या हस्ते हंबीरराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.