गांधीनगरमध्ये सरकारी जमिनीत बहुमजली इमारतीचे बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:16 IST2020-12-07T04:16:53+5:302020-12-07T04:16:53+5:30
कोल्हापूर : गांधीनगर येथे वळिवडे रस्त्यावर महाराष्ट्र शासनाच्या नावावर असलेल्या जमिनीवर विठ्ठल कृष्णा पोवार यांच्याकडून बेकायदेशीरपणे बहुमजली इमारतीचे बांधकाम ...

गांधीनगरमध्ये सरकारी जमिनीत बहुमजली इमारतीचे बांधकाम
कोल्हापूर : गांधीनगर येथे वळिवडे रस्त्यावर महाराष्ट्र शासनाच्या नावावर असलेल्या जमिनीवर विठ्ठल कृष्णा पोवार यांच्याकडून बेकायदेशीरपणे बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. दोन ते तीन महिन्यांपासून हे बांधकाम सुरू असूनही स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने शामलाल आरतमल बंचराणी यांनी थेट करवीर पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्याकडेच तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदार बंचराणी यांनी गांधीनगर ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना याबाबत कळविले आहे; पण तरीही बांधकाम सुरूच असल्याने त्यांनी करवीर पंचायत समिती व जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागाकडे लेखी तक्रार देऊन हे बेकायदेशीर काम थांबविण्याची विनंती केली आहे. ही जागा सरकारी असतानाही पोवार यांनी ती अतिक्रमित केली आहे. या जागेची किंमत कोट्यवधीची आहे. बांधकाम कायद्याप्रमाणे सिंधू मार्केटमधील बेकायदेशीर गाळे ज्याप्रमाणे पाडण्यात आले, त्याच नियमाने हे बेकायदेशीर बांधकामही पाडावे, अशी मागणी केली आहे.
फोटो: ०६१२२०२०-कोल-गांधीनगर