कंदलगावात शासकीय जागेत अतिक्रमण करून बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:25 IST2021-01-25T04:25:35+5:302021-01-25T04:25:35+5:30
पाचगाव : कंदलगाव ता. करवीर येथे सर्व्हे न. १०७मध्ये गटारी बुजवून त्यावर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी विजय ...

कंदलगावात शासकीय जागेत अतिक्रमण करून बांधकाम
पाचगाव : कंदलगाव ता. करवीर येथे सर्व्हे न. १०७मध्ये गटारी बुजवून त्यावर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी विजय पाटील व विजेचा खांब उखडून काढल्याने चंदर संभाजी संकपाळ यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार ग्रामपंचायत सदस्य दशरथ वसंत पाटील यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा केली. ग्रामपंचायत हद्दीतील सर्व्हे न. १०७ मध्ये शासनाने अधिग्रहित केलेल्या मिळकतीत शासन अनुदानातून ग्रामपंचायतकडून रस्ते व गटारी बांधल्या आहेत. परंतु चंदर संकपाळ यांनी सर्व्हे न. १०७ मध्ये सदरच्या गटारी व रस्त्याशेजारील गटार व ग्रामपंचायतीने लावलेली झाडे तोडली आहेत तसेच या मिळकतीत असलेला विजेचा खांबदेखील उखडून टाकला आहे. विजय सदाशिव पाटील यांनीही रस्त्यावर बांधकाम करत शासकीय जागेत अतिक्रमण केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.