बांधकाम सभापती वंदना जाधव यांचा कार्यालय प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:17 IST2021-07-16T04:17:31+5:302021-07-16T04:17:31+5:30

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि आरोग्य समितीच्या सभापती वंदना अरुण जाधव यांनी गुरुवारी कार्यालय प्रवेश करून कार्यभार स्वीकारला. आमदार ...

Construction Chairman Vandana Jadhav enters the office | बांधकाम सभापती वंदना जाधव यांचा कार्यालय प्रवेश

बांधकाम सभापती वंदना जाधव यांचा कार्यालय प्रवेश

कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि आरोग्य समितीच्या सभापती वंदना अरुण जाधव यांनी गुरुवारी कार्यालय प्रवेश करून कार्यभार स्वीकारला. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्याहस्ते फीत कापून कार्यालय प्रवेश करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, महिला आणि बालकल्याण समिती सभापती शिवानी भोसले उपस्थित होत्या. यावेळी जि. प. सदस्य हंबीरराव पाटील, राेहिणी आबिटकर, सविता चौगुले, मनीषा कुरणे, स्वाती सासने, भुदरगडच्या सभापती आक्काताई नलवडे, राधानगरीच्या उपसभापती वनिता पाटील, तालुकाप्रमुख भिकाजी हळदकर, गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे, अभिजित तायशेटे, युवा नेते वीरेंद्र मंडलिक उपस्थित होते.

१५०७२०२१ कोल झेडपी ०१

जिल्हा परिषदेच्या बांधकाम समिती सभापती वंदना जाधव यांचा कार्यालय प्रवेश शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्याहस्ते फीत कापून झाला. यावेळी डावीकडून जयवंतराव शिंपी, राहुल पाटील, वीरेंद्र मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर उपस्थित होते.

Web Title: Construction Chairman Vandana Jadhav enters the office