मतदारसंघातील शाळांना स्मार्ट टीव्ही, प्रिंटर देणार : जयंत आसगावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:29 IST2021-08-21T04:29:25+5:302021-08-21T04:29:25+5:30
कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या सभागृहात आमदार जयंत आसगावकर यांच्या फंडातून कोल्हापूर शहर, करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, कागल तालुक्यातील माध्यमिक ...

मतदारसंघातील शाळांना स्मार्ट टीव्ही, प्रिंटर देणार : जयंत आसगावकर
कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या सभागृहात आमदार जयंत आसगावकर यांच्या फंडातून कोल्हापूर शहर, करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, कागल तालुक्यातील माध्यमिक शाळांना स्मार्ट टीव्ही, प्रिंटर, संदर्भ पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षण संस्था संघटनेचे अध्यक्ष वसंतराव देशमुख होते.
आमदार आसगावकर म्हणाले, महापुरात शैक्षणिक नुकसान झालेल्या शाळांना भेटी दिल्या, शाळांना सीएसआर फंडातून मदत करण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करणार आहे.
मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ, वसंतराव देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष मिलिंद पांगिरेकर यांनी आभार मानले. संघाचे सचिव दत्ता पाटील, भरत रसाळे, बी. जी. बोराडे, सुभाष पाटील, बाबा पाटील, एस. एन. माळकर, उदय पाटील, ‘कोजिमाशि’पतपेढीचे अध्यक्ष एस. बी. पाटील, उपाध्यक्ष शिवाजीराव लोंढे, संजय पाटील आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : आमदार जयंत आसगावकर यांच्या फंडातून शाळांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी बाबा पाटील, सुरेश संकपाळ, वसंतराव देशमुख आदी उपस्थित होते. (फोटो-२००८२०२१-कोल-शिक्षण)