कॉन्स्टेबलने केली दीड लाखांची बॅग परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:25 IST2021-01-03T04:25:52+5:302021-01-03T04:25:52+5:30
पट्टणकोडोली : मूळचे पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील असलेले व सध्या बोरिवली रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेल्या गुंडा सोमा रामाण्णा या ...

कॉन्स्टेबलने केली दीड लाखांची बॅग परत
पट्टणकोडोली : मूळचे पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील असलेले व सध्या बोरिवली रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेल्या गुंडा सोमा रामाण्णा या पोलीस कॉन्स्टेबलनी त्यांना सापडलेली एक लाख साठ हजार रुपये रक्कम असलेली बॅग प्रामाणिकपणे परत केली आहे. रामाण्णा यांनी भारतीय सैन्यातही सेवा बजावली आहे. सध्या ते रेल्वे पोलिसात कार्यरत आहेत. त्यांच्या प्रामाणिकपणाचे पट्टणकोडोली गावातूनही कौतुक होत आहे. येथील गुंडा रामाण्णा हे पैलवान असून, तीन वर्षांपूर्वी ते रेल्वे पोलिसात रुजू झाले आहेत. रामाण्णा हे सध्या बोरिवली येथे कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असून, नेहमीप्रमाणे ते बोरिवली रेल्वे स्थानकावर आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना एक बॅग सापडली. या बॅगेत त्यांना एक लाख ६० हजार रुपये असल्याचे दिसले. त्यांनी या बॅगेबाबत माहिती घेतली असता, ही बॅग मालाड येथील मनिष मेहता यांची असल्याचे समजले. बोरिवली पोलीस ठाण्यामध्ये मनिष मेहता यांना बोलावून रामाण्णा यांनी त्यांना बॅग परत केली.
फोटो ओळ : बोरिवली रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेले पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील पोलीस कॉन्स्टेबल गुंडा सोमा रामाण्णा यांनी त्यांना सापडलेली बॅग प्रामाणिकपणे परत केली.
०२ पट्टणकोडोली पोलीस