शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बार्टी-सारथीच्या लाभार्थ्यांना उच्च शिक्षणापासून दूर ठेवण्याचा कट; लाभ मिळू नये अशा अटी

By संदीप आडनाईक | Updated: September 11, 2024 14:11 IST

संदीप आडनाईक कोल्हापूर : इयत्ता १० वी नंतर व्यावसायिक पदविका अभ्यासक्रम शिकवणाऱ्या खासगी विनाअनुदानित महाविद्यालयाचे अभ्यासक्रम राज्यातील इतर मागासवर्ग ...

संदीप आडनाईककोल्हापूर : इयत्ता १० वी नंतर व्यावसायिक पदविका अभ्यासक्रम शिकवणाऱ्या खासगी विनाअनुदानित महाविद्यालयाचे अभ्यासक्रम राज्यातील इतर मागासवर्ग प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या राज्य सरकारच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेतून वगळून त्यांच्या शिक्षणाच्या संधीही हिरावून घेतल्या आहेत. महत्वाचे म्हणजे बार्टी आणि सारथी संस्थांतील लाभार्थी विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी उत्तीर्ण आणि ६० टक्के गुण असण्याची अट घातली आहे. याचा फटका या विद्यार्थ्यांना बसणार असून, सरकारने त्यांना उच्च शिक्षणापासून दूर ठेवण्याचाच कट केला आहे.ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत वसतिगृहातील प्रवेश आणि संबंधित व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या या समाजासाठी आरक्षित जागा पूर्ण क्षमतेने भरत नाहीत, हे वास्तव आहे. असे असताना लाभार्थी विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी उत्तीर्ण आणि ६० टक्के गुण असण्याची अट घातली आहे. त्यामुळे किमान गुणांची मर्यादा ४५ टक्क्यांपर्यंत खाली आणावी, यामुळे आधार योजना, स्वयंम योजनेचा लाभ या विद्यार्थ्यांना मिळू शकेल, अशी मागणी ओबीसी बहुजन पार्टीने केली आहे.

शासन आदेश

  • १३ डिसेंबर २०२३ : वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी अनुदान देण्याबाबत इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी योजना.
  • १९ डिसेंबर २०२३ : राज्यातील इतर मागासवर्ग प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमासाठी योजना.
  • १८ जून २०२४ : भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पं. दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजना.
  • ११ मार्च २०२४ : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना.

एकतर रडतखडत इयत्ता १० वीपर्यंत मजल मारणाऱ्या या विद्यार्थ्यांना १० वी नंतरच्या पदविका व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी, तसेच वसतिगृह प्रवेशासाठी ६० टक्के गुणांचे निकष लावण्याचा शासन निर्णय काढून त्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले आहे. याशिवाय या अभ्यासक्रमांना बारावी उत्तीर्ण असण्याची अट घालून त्यांना वसतिगृहातील प्रवेशापासूनही दूर ठेवले आहे. - सयाजी झुंझार, संघटक, ओबीसी बहुजन पार्टी, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्रGovernmentसरकार