प्रत्येक जिल्ह्यात वक्फ अधिकारी नेमण्याचा विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:27 IST2021-09-26T04:27:16+5:302021-09-26T04:27:16+5:30
शेख म्हणाले, वक्फ बोर्डातील प्रलंबित प्रकरणे लवकरात निकाली काढली जाण्याकरिता प्रत्येक जिल्ह्यात वक्फ अधिकारी नेमण्याचा प्रस्ताव बोर्डाच्या विचाराधीन आहे. ...

प्रत्येक जिल्ह्यात वक्फ अधिकारी नेमण्याचा विचार
शेख म्हणाले, वक्फ बोर्डातील प्रलंबित प्रकरणे लवकरात निकाली काढली जाण्याकरिता प्रत्येक जिल्ह्यात वक्फ अधिकारी नेमण्याचा प्रस्ताव बोर्डाच्या विचाराधीन आहे. याबाबत लवकरच निर्णय होईल. मुतवली व विश्वस्तांनी वक्फ निधी वेळच्या वेळी जमा करावा, अशी सूचना केली. या कार्यशाळेत ९० संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांच्याकडून ३० नोंदणी प्रस्ताव दाखल करण्यात आले. ॲड. जावेद महंमद जकरिया फुलेवाले यांनी वक्फ ॲक्ट व महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टमधील तरतुदींची माहिती दिली. मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांनी प्रत्येक जिल्ह्यात वक्फ बोर्डाची शाखा स्थापन करावी. संस्थेने ऑडिट फी भरावी, असे आवाहन केले. वक्फ बोर्डाबद्दल उपमुख्य कार्यकारी अधिकारी फारूख पठाण यांनी माहिती दिली. बैतुलमाल कमिटीचे अध्यक्ष जाफरबाबा सय्यद, कादर मलबारी, ॲड. मुनाफ मणेर यांनी मनोगत व्यक्त केले. ॲड. खदिजा सनदी यांनी सूत्रसंचालन व ॲड. इम्रान इनामदार यांनी आभार मानले.
यावेळी वक्फ बोर्डाचे अधिकारी खुसरो खान, आसिफ मुतवली, शारीक काझी, उबेद पटेलमा, फारूख पटवेगार, आदिल फरास, ॲड. शौकत अली फकीर, ॲड. सैफअली फकीर, ॲड. अर्शद मोमीन, ॲड. शहनवाज पटेल, ॲड. मोहसीन शेख, जमीर मुल्ला, फय्याज शिकलगार, आरिफ तांबोळी, याकुब बक्ष, आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो : २५०९२०२१-कोल-मुस्लीम बोर्डिंग
आेळी : कोल्हापुरातील मुस्लिम बोर्डिंगमध्ये शनिवारी झालेल्या एकदिवसीय वक्फ बोर्डाच्या कार्यशाळेत वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कादर मलबारी, गणी आजरेकर, फारूख पठाण, उबेद पटेल, खुसरो खान, जाफरबाबा सय्यद उपस्थित होते.