शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

काॅन्झरर्वेशन फौंडेशनने तयार केले पर्यावरणपूरक सीड पेपर कॅलेंडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 18:10 IST

environment kolhapur- दि कॉन्झरवेशन फौंडेशन ऑफ इडियाने २०२१ या नविन वर्षासाठी पर्यावरणपूरक कॅलेंडर बनवले आहे असून प्रत्येक पानांमध्ये रोपे उगवणाऱ्या बियांचा समावेश आहे. पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी संस्थेने याचे मोफत वितरण केले.

ठळक मुद्देकाॅन्झरर्वेशन फौंडेशनने तयार केले पर्यावरणपूरक सीड पेपर कॅलेंडरपानांपानांत विविध बीया, जनजागृतीसाठी मोफत वितरण

कोल्हापूर : दि कॉन्झरवेशन फौंडेशन ऑफ इडियाने २०२१ या नविन वर्षासाठी पर्यावरणपूरक कॅलेंडरबनवले आहे असून प्रत्येक पानांमध्ये रोपे उगवणाऱ्या बियांचा समावेश आहे. पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी संस्थेने याचे मोफत वितरण केले.दरसाली नवीन वर्षासाठी वेगवेगळ्या प्रकारची कॅलेंडर तयार करण्यात येत असतात. त्यामध्ये, निसर्गचित्रे व्यक्ती, ऐतिहासिक वास्तू, विविध संदेश, माहिती यांचा समावेश असतो. असे कॅलेंडर महिना संपल्यावर पडून अथवा टाकली जातात. मात्र येथील दि कॉन्झरर्वेशन फौंडेशन ऑफ इंडिया या संस्थेने मागील वर्षापासून पर्यावरणपूरक आगळ्या वेगळ्या कॅलेंडरची निर्मिती केली आहे. यातील प्रत्येक पृष्ठातून रोपे उगवणार आहेत.महिना संपल्यानंतर या कॅलेंडरमधील पृष्ठांचे मातीत रोपण केल्यास त्यातुन चार प्रकारची रोपे उगवणार आहेत. कॉन्झरर्वेशन फौंडेशनने बनवलेल्या या नाविन्यपूर्ण कॅलेंडरचे प्रकाशन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते आणिजेष्ठ वनस्पती तज्ञ प्रा. मधुकर बाचुळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.दर तीन महिन्यांसाठी एक पान अशी चार पाने असून, त्यावर पर्यावरण संदेशही देण्यात आले आहेत. अमन मित्तल यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक करून अश्या कागदाचा वापर जास्तीत जास्त करण्याबाबत यावेळी आवाहन केले. प्रा.मधुकर बाचुळकर याांनीही या संकल्पनेमुळे समाजात पर्यावरणाप्रती आवड निर्माण होऊन निसर्ग वाचविण्यासाठी हातभार लागणार असल्याचे सांगितले.प्रारंभी फौंडेशनचे अध्यक्ष आशिष घेवडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. अंजली पाटील यांनी या कॅलेंडरच्या संकल्पनेविषयी माहिती दिली. याप्रसांगी चैतन्य पोतदार, विश्वजीत सावंत तसेच फौंडेशनचे सदस्य उपस्थित होते. प्रा. संजय पाठारे यांनी आभार मानले. 

टॅग्स :environmentपर्यावरणkolhapurकोल्हापूर