शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आमदार पुढे आले प्रत्येक तालुक्यासाठी रुग्णवाहिका देण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 13:47 IST

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही महापालिका क्षेत्रासाठी रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी पत्र दिले आहे. खासदार प्रा संजय मंडलिक आणि आमदार राजू आवळे यांनीही इतर यंत्रसामुग्री खरेदीसाठी निधी दिला आहे.आमदार फंडामधून या  रुग्णवाहिका लवकरच घेण्यात येतील, असेही पालकमंत्री श्री पाटील म्हणाले.

ठळक मुद्देआमदारांची निधीसाठी संमतीकागल आणि गडहिंग्लजमध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफसाहेबांनी फौंडेशनच्या माध्यमातून रुग्णवाहिका दिली आहे.

कोल्हापूर :  कोवीड काळजी केंद्रासाठी आमदार फंडामधून प्रत्येक तालुक्यासाठी एक रुग्णवाहिका देण्यासाठी आमदार पुढे आले आहेत. यासाठी आपल्या फंडातून निधीदेण्यासाठी आमदारांनी संमती दिली आहे, अशी माहिती पालकमंत्री  सतेज पाटील यांनी आज दिली. जिल्ह्यामध्ये एकूण ४१ कोवीड काळजी केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यामध्ये कोवीड- १९ चा प्रादुर्भाव होवू नये यासाठी सर्वतोपरी दक्षता घेण्यात येत आहे. या सर्व कोवीड काळजी केंद्रांसाठी सुविधा देण्यासाठी प्रत्येक तालुक्याला एक रुग्णवाहिका देण्यासाठी आमदारांनी संमती दिली आहे.   

आमदार राजेश पाटील हे चंदगडसाठी, आमदार पी एन पाटील हे करवीरसाठी, आमदार चंद्रकांत जाधव आणि आमदार ऋतुराज पाटील हे महापालिका क्षेत्रासाठी, आमदार विनय कोरे हे शाहूवाडी, आमदार प्रकाश आवाडे हे इचलकरंजी ता. हातकणंगले, आमदार प्रकाश आबिटकर हे भुदरगड- राधानगरीसाठी, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे शिरोळसाठी रुग्णवाहिका देणार आहेत. मी इचलकरंजी नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रासाठी रुग्णवाहिका देणार आहे. सर्वांनी यासाठी निधी देण्यास संमती दिली आहे.कागल आणि गडहिंग्लजमध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफसाहेबांनी फौंडेशनच्या माध्यमातून रुग्णवाहिका दिली आहे. खासदर धैर्यशिल माने यांनीही सॅनिटायझरसाठी लागणाऱ्या ट्रॅक्टर आणि फवारणी यंत्रासाठी निधी दिला आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही महापालिका क्षेत्रासाठी रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी पत्र दिले आहे. खासदार प्रा संजय मंडलिक आणि आमदार राजू आवळे यांनीही इतर यंत्रसामुग्री खरेदीसाठी निधी दिला आहे.आमदार फंडामधून या  रुग्णवाहिका लवकरच घेण्यात येतील, असेही पालकमंत्री श्री पाटील म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMLAआमदारhospitalहॉस्पिटल