शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
2
तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला
3
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ
4
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
6
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण
7
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोर जवाहरलाल दर्डा यांचा पुतळा; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
8
GST सह सोन्याचा दर पोहचला १,००,००० प्रति तोळा; ग्राहकांना २० टक्के परतावा
9
रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा
10
धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
11
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे
12
२१ वर्ष पूर्ण झालेल्या नव्याने पात्र ठरणाऱ्या ‘लाडक्या बहिणीं’ना केव्हा मिळणार लाभ?
13
विमानतळावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना नाहक त्रास नको; हायकोर्टाने कंपन्यांना फटकारले
14
कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू
15
प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; तांत्रिक पुराव्यामुळे फुटले अभय कुरुंदकरचे बिंग
16
क्रांतिकारी मेंढपाळ गेला! अत्यंत मृदू आणि अतूट श्रद्धेचा एक स्वर कायमचा शांत झाला
17
चॅटजीपीटीचा वापर करून २ बहिणींनी केली कमाल; वाचवले तब्बल १० हजार डॉलर्स
18
‘पॉवर’ दाखवा, पृथ्वीला मूठभर अब्जाधीशांच्या आर्थिक दादागिरीतून सोडवा!
19
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
20
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत

Kolhapur: ‘करवीर’मध्ये महायुतीत बंड, पण हादरा काँग्रेसला; पाटील-नरके यांच्या लढाईत जनसुराज्यमुळे रंगत

By राजाराम लोंढे | Updated: October 14, 2024 16:38 IST

राहुल पाटील यांची ’सहानुभूती’ची तर नरके यांची ‘संपर्काची हवा

राजाराम लोंढेकोल्हापूर : ‘करवीर’मध्येकाँग्रेसकडून राहुल पाटील व शिंदेसेनेकडून चंद्रदीप नरके यांच्यात सरळ लढत होईल, असे वाटत असताना जनसुराज्य पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांनी संताजी घोरपडे यांची उमेदवारी घोषित करून लढत आणखी रंगतदार केली आहे. पन्हाळ्यातून जनसुराज्य पक्षाची साथ नेहमीच दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांना मिळाली. त्यामुळे घाेरपडे यांची उमेदवारी महायुतीमध्ये बंड मानले जात असले तरी त्याचे हादरे मात्र काँग्रेसला बसण्याची शक्यता अधिक आहे. पाटील व नरके यांच्या लढाईत घाेरपडे यांच्या उमेदवारींनी नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.नरके हे पराभूत झाल्यापासून नव्याने बांधणीला लागले होते. संपर्क व राजकीय मुत्सद्दीगिरीच्या बळावर त्यांनी हवा केली आहे. राहुल पाटील यांना दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांची सहानुभूती आहे, पण सहानुभूती शेवटपर्यंत टिकवून मैदान मारण्याचे आव्हान त्यांच्या राहणार हे मात्र निश्चित आहे.पन्हाळ्यातील दुरुस्ती नरकेंना सावरणार?मागील निवडणुकीत पी. एन. पाटील यांना पन्हाळा व गगनबावड्याने मोठा ‘हात’ दिला होता. त्या बदल्यात श्रृतिका काटकर यांना जिल्हा बँकेची उमेदवार संधी दिली. त्यामुळे शाहू काटकर यांच्यावर पन्हाळ्याची जबाबदारी आहे. पण, मागील निवडणुकातील चुका दुरुस्त करत चंद्रदीप नरके यांनी लावलेल्या जोडण्या यशस्वी झाल्या तर बालेकिल्ला पूर्ववत राहू शकतो.सतेज पाटील, ‘चेतन’ यांच्यावर ‘राहुल’ यांची मदारकरवीर’मध्ये आमदार सतेज पाटील व ‘गोकुळ’चे संचालक डॉ. चेतन नरके यांची निर्णायक ताकद आहे. मागील निवडणुकीत या दोघांमुळेच पी. एन. पाटील यांनी चंद्रदीप नरके यांची हॅटट्रिक रोखली होती. आमदार पाटील व डॉ. नरके हे किती ताकदीने उतरणार यावरच येथील गणित अवलंबून राहणार आहे.

राजेंद्र सूर्यवंशी यांची चाचपणी‘करवीर’चे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनीही चाचपणी सुरू केली आहे. त्यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा अद्याप केलेली नाही. ‘जनसुराज्य-शेकाप’ आघाडीकडून २०१४ ला त्यांनी नशीब आजमावले होते, पण त्यांना यश आले नाही. त्यांच्यासह कॅप्टन उत्तम पाटील यांनीही तयारी केली आहे.

मागील २०१९ ला उमेदवारांना मिळालेली मते 

  • पी. एन. पाटील : १,३५,६७५
  • चंद्रदीप नरके : १,१३,०१४
  • डॉ. आनंद गुरव : ४,४१२

सध्याचे मतदान 

  • एकूण : ३,२०,८१९
  • पुरुष : १,६६,२६१
  • महिला : १,५४,५५८
टॅग्स :kolhapurकोल्हापूरkarvir-acकरवीरvidhan sabhaविधानसभाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे