सत्तारूढची निर्णायक बाजी

By Admin | Updated: May 5, 2015 01:16 IST2015-05-05T01:16:02+5:302015-05-05T01:16:02+5:30

‘चौंडेश्वरी’ची निवडणूक : सर्व उमेदवारांना सुमारे ३५० मताधिक्य

Congressional ruling | सत्तारूढची निर्णायक बाजी

सत्तारूढची निर्णायक बाजी

इचलकरंजी : येथील चौंडेश्वरी सहकारी सूतगिरणीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सत्तारूढ पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी विरोधी सुकाणू समिती पॅनेलवर विजय मिळविला. सुमारे ३५० मताधिक्याने सत्तारूढ पॅनेलचे उमेदवार विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी डी. पी. देसाई यांनी निकाल घोषित केल्यानंतर सत्तारूढ पॅनेलच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत गुलालाची उधळण केली आणि विजयी उमेदवारांची मिरवणूक काढली.
साधारणत: १९ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या चौंडेश्वरी सूतगिरणीचे कार्यस्थळ धरणगुत्ती (ता. शिरोळ) येथे आहे. सूतगिरणीचे २३६३ सभासद असून, संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव डाके, विद्यमान अध्यक्ष सुनील सांगले यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ पॅनेल व देवांग समाज सुकाणू समितीच्या अधिपत्याखाली रामलिंग चौंडेश्वरी पॅनेल यामध्ये सरळ लढत होती. रविवारी झालेल्या मतदानात १८१८ सभासदांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गोविंदराव हायस्कूलमध्ये मतमोजणीस सुरुवात झाली. साधारणत: अकरा वाजण्याच्या सुमारास सर्वच निकाल हाती आला. त्यामध्ये सत्तारूढ पॅनेलच्या उमेदवारांना सरासरी एक हजार, तर विरोधी सुकाणू समितीच्या उमेदवारांना सरासरी ६५० मतदान झाल्याचे आढळून आले. मतमोजणीच्या एकूण चार फेऱ्या झाल्या. पहिल्या फेरीपासूनच सत्तारूढ पॅनेलने आपली आघाडी कायम ठेवली.निवडणुकीमध्ये विजयी उमेदवारांना पडलेली मते पुढीलप्रमाणे : यंत्रमाग-हातमाग विणकर गट - विद्यमान अध्यक्ष सुनील नारायण सांगले (१०६८), श्रीकांत व्यंकटेश कबाडे (१०३०), जालंदर विठोबा दाते (१०४२), कृष्णात गणपती धुत्रे (१०४६), रवींद्र शंकर फाटक (१०४४), किशोर सदाशिव बोळाज (९७३), कृष्णात रघुनाथ भुत्ते (१०१२), मनोहर काशिनाथ भंडारे (१०३३), रामचंद्र दौलू मेटे (१०६६), शिवाजी रामचंद्र रेडेकर (१००७), कृष्णात रामचंद्र वीर (९८०), विलासराव शिवाप्पा साळमाळगे (९८१). इतर मागासवर्गीय प्रवर्ग - विद्यमान उपाध्यक्ष श्रीकांत गणपती हजारे (९७७). भटक्या विमुक्त जाती-जमाती - सुरेंद्र वीरूपाक्ष गदाळे (१०१९). अनुसूचित जाती-जमाती - डॉ. विलास शंकरराव खिलारे (१०७३). महिला राखीव - उज्ज्वला गोरखनाथ डाके (१०७५), वासंती विजय होगाडे (१०३९).
पराभूत उमेदवार पुढीलप्रमाणे : आनंद तुकाराम उबाळे (६५४), शिरीष गजानन कांबळे (६६४), गजानन गुंडाप्पा खारगे (६५८), सुरेश रामचंद्र पाडळे (६३२), राजेंद्र महादेव बिद्रे (६२४), प्रमोद बाबूराव मुसळे (६५४), सुनील बापूसाहेब म्हेत्तर (६८६),
रोहन महेश सातपुते (६०५), शितलकुमार मारुती सातपुते (५८७), सुरेश मुरलीधर सातपुते (५९८), शशिकांत बंडू हावळ (६८६), रघुनाथ दिनकर होगाडे (६६०), संजय महादेव कांबळे (७५१), विजय दगडू मुसळे (७५४), अरुण मारुती निंबाळकर (६९५), सुलोचना अनंत डंबाळ (६८७), मालती धोंडीराम तारळेकर (६६३).
याशिवाय अपक्ष म्हणून उभे राहिलेले बाळकृष्ण महादेव
ढवळे (९६), सुनील नारायण मकोटे (७८) व सुनील पांडुरंग बारवाडे (३७) अशी मते मिळाली. (प्रतिनिधी)

Web Title: Congressional ruling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.