वस्त्रनगरीच्या विकासासाठी कॉँग्रेसला साथ हवी

By Admin | Updated: October 5, 2014 23:06 IST2014-10-05T22:50:02+5:302014-10-05T23:06:33+5:30

प्रकाश आवाडे : प्रचारार्थ खंजिरे मळा, सुतार मळा, परिसरात पदयात्रा

Congress wants companionship for the development of textiles | वस्त्रनगरीच्या विकासासाठी कॉँग्रेसला साथ हवी

वस्त्रनगरीच्या विकासासाठी कॉँग्रेसला साथ हवी

इचलकरंजी : कामगार, कष्टकरी, झोपडपट्टीवासीय, यंत्रमागधारक, व्यापारी, व्यावसायिक अशा सर्व क्षेत्राची प्रगती करण्याचे कार्य कॉँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केले आहे. हे काम आणखीन जोमाने करून इचलकरंजी वस्त्रनगरीला पुन्हा विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी मला खंबीर साथ द्यावी, असे प्रतिपादन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले.
येथील विधानसभा मतदारसंघातील कॉँग्रेस व मित्रपक्षाचे उमेदवार प्रकाश आवाडे यांच्या प्रचारासाठी खंजिरे मळा, सुतार मळा, लक्ष्मी मार्केट परिसर, लक्ष्मी झोपडपट्टी, लालनगर, वेताळ पेठ, गांधी कॅम्प, गोंधळी गल्ली, कोरवी गल्ली, नेहरूनगर झोपडपट्टी, वखार भाग, सहकारनगर, साईट नं. १०२, आसरानगर, शिक्षक सोसायटी, वृंदावन कॉलनी, गुलमोहर कॉलनी, सांगली नाका परिसर, आदी प्रभागांमध्ये पदयात्रा काढण्यात आली.
पदयात्रेमध्ये काही सुवासिनींनी आवाडेंना औक्षण करून तसेच युवा मतदारांबरोबर वयोवृद्ध मतदारांनी त्यांच्याशी संवाद साधला.
पदयात्रेमध्ये विठ्ठलराव डाके, सुनील कोष्टी, सुनील जाधव, तौफिक मुजावर, रामदास चौगुले, शांताराम लाखे, रवी रजपुते, श्रीनिवास काजवे, शेखर हळदकर, भीमराव अतिग्रे, संजय केंगार, रत्नप्रभा भागवत, नंदा साळुंखे, राहुल खंजिरे, बापूसाहेब घुले, शबाना शिकलगार, बाळासाहेब क्षीरसागर, प्रकाश दत्तवाडे, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)

Web Title: Congress wants companionship for the development of textiles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.