शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरातील काँग्रेस उतरली रस्त्यावर: प्रत्येक तालुक्यातही आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 19:15 IST

Congress Kolhapur- केंद्र सरकारचे अन्यायी तीन कृषी कायदे, महागाईविरोधात शुक्रवारी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसनेही लक्षणीय सहभाग नोंदवला. जिल्हा काँग्रेस कमिटीसह सर्व तालुक्यांत एक दिवसाचे उपोषण सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व काँग्रेस नेते, कार्यकर्ते यांची रीघ लागली होती, यानिमित्त का असेना, पण बऱ्याच वर्षांनी काँग्रेसच्या नव्या- जुन्या कार्यकर्त्यांचे पाय काँग्रेस कमिटीला लागले.

ठळक मुद्देजिल्हाभरातील काँग्रेस उतरली रस्त्यावर: प्रत्येक तालुक्यातही आंदोलन एक दिवसाचे उपोषण करून भारत बंदमध्ये सहभाग

कोल्हापूर : केंद्र सरकारचे अन्यायी तीन कृषी कायदे, महागाईविरोधात शुक्रवारी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसनेही लक्षणीय सहभाग नोंदवला. जिल्हा काँग्रेस कमिटीसह सर्व तालुक्यांत एक दिवसाचे उपोषण सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व काँग्रेस नेते, कार्यकर्ते यांची रीघ लागली होती, यानिमित्त का असेना, पण बऱ्याच वर्षांनी काँग्रेसच्या नव्या- जुन्या कार्यकर्त्यांचे पाय काँग्रेस कमिटीला लागले.अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या आवाहनानुसार शुक्रवारी भारत बंद आंदोलन झाले. काँग्रेस यात ताकदीने उतरेल, असे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांनी जाहीर केल्यानुसार राज्यभरातही आक्रमकपणे एक दिवसाचे उपोषण करा, असे आदेश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले होते. जिल्हा मुख्यालय व तालुका कार्यालयातही जोरदारपणे आंदोलन करण्याचे आदेश शिरसावंद्य मानून कोल्हापुरातील आंदोलनाला बऱ्याच वर्षांनी बहुतांश काँग्रेस नेत्यांनी रस्त्यावर उतरवत हजेरी लावली. स्टेशन रोडवरील काँग्रेस कमिटीत शहर व करवीर तालुका तर इतर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी स्थानिक आजी- माजी आमदारांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.कोल्हापुरातील आंदोलनाचे नेतृत्व पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. पक्षनिरीक्षक म्हणून आ. शिरीष चौधरी उपस्थित होते. यावेळी शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, आ. जयंत आसगावकर, गोपाळराव पाटील, सचिन चव्हाण, तौफिक मुल्लाणी, गुलाबराव घोरपडे, बाळासाहेब सरनाईक, दिलीप पाटील, सुरेश कुऱ्हाणे, संध्या घोटणे यांच्यासह काँग्रेस, नेते कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर