शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
2
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
3
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
4
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
5
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
6
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
7
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
8
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी
9
गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...
10
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
11
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
12
बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...
13
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...
14
तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या
15
Manoj Jarange Patil: "माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही, एकालाही काठी लावली तर मुंबईसह महाराष्ट्र बंद करू"
16
चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची आवडती कार, मोदींनीही केली सफर! 'लाल झेंडा' असलेल्या 'या' गाडीत खास काय?
17
भारतात रस्ते अपघातात दर तासाला २० जणांचा मृत्यू, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती
18
GST कमी झाल्यास, किती स्वस्त होऊ शकते मोस्ट-सेलिंग Maruti Ertiga? किती रुपयांचा होऊ शकतो फायदा? जाणून घ्या
19
'आरक्षण बचाव'ची मागणी, मराठा आंदोलनाचे केंद्रबिंदू अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण
20
Mumbai Local: मराठा आंदोलनामुळे मुंबईची लाईफलाईन खोळंबली! सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसचा दावा मजबूत; राजकीय घडामोडींचा परिणाम 

By विश्वास पाटील | Updated: July 4, 2023 12:09 IST

..तर ही जागा जिंकणे काँग्रेसला अवघड नाही

विश्वास पाटीलकोल्हापूर : कोल्हापूरलोकसभा मतदारसंघावरील राज्यातील नव्या राजकीय उलथापालथीनंतर काँग्रेसचा दावा मजबूत झाल्याचे मानले जात आहे. फक्त त्या पक्षाकडे सद्य:स्थितीत ही निवडणूक लढवायची कुणी? हाच प्रश्न आहे. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ हे भाजपसोबत गेल्याने राष्ट्रवादीकडे आता ही जागा आम्हाला द्या, असे म्हणण्याचीही ताकद उरली नाही. गेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही जागा शिवसेनेने (ठाकरे गट) जिंकल्या होत्या; परंतु त्या पक्षाकडे उमेदवार असले तरी सहाही मतदारसंघांतील राजकीय ताकद कमी पडते.ठाकरे गटात फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेले. त्यामुळे महाविकास आघाडीतून या दोन्ही जागांवर राष्ट्रवादीने दावा सांगितला होता. त्यातील किमान कोल्हापूरची जागा तरी पक्षाला मिळावीच, असा त्यांचा दबाव होता. कारण गेल्या निवडणुकीपूर्वी ही जागा राष्ट्रवादीकडे होती; परंतु आता नव्या राजकीय घडामोडींनंतर राष्ट्रवादीची ताकदही जिल्ह्यात कमकुवत झाली आहे. त्यामुळे त्या पक्षाकडून या जागेचा आग्रह कितपत केला जातो, हा प्रश्नच आहे.त्या तुलनेत काँग्रेस या मतदारसंघात मजबूत आहे. १९७१ पासून तब्बल सातवेळा या पक्षाकडे हा मतदारसंघ राहिला आहे. आज काँग्रेसचे सर्वश्री पी.एन. पाटील, ऋतुराज पाटील, जयश्री जाधव आणि राजू आवळे हे विधानसभेचे आमदार आहेत. विधानपरिषदेत सतेज पाटील, जयंत आसगावकर आहेत. यापैकी आवळे वगळता अन्य पाचही आमदारांचे कार्यक्षेत्र कोल्हापूर मतदारसंघात येते. आमदार सतेज पाटील यांनी राधानगरी, भुदरगड, चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यांतही पक्षाची चांगली बांधणी केली आहे.कागलमध्येच पक्षाला तुलनेत कमी पाठबळ असले, तरी मंडलिक यांच्या विरोधातील लोकबळ तिथे मदतीला येईल. संजय घाटगे, समरजित घाटगे यांची भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही. त्यापैकी आजच्या घडीला तरी संजय घाटगे हे महाविकास आघाडीसोबत आहेत. अशा स्थितीत या मतदारसंघात काँग्रेस वादळ निर्माण करू शकते.

आता काँग्रेससाठीच... आमचं ठरू द्या...गेल्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी ‘आमचं ठरलंय’ ही कॅचलाइन राज्याला देऊन शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना निवडून आणण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. आता तशीच ताकद त्यांनी काँग्रेससाठी लावली तर ते नक्कीच हवा निर्माण करू शकतात.

उमेदवारांचाच शोध..आमदार पी.एन. पाटील यांच्यासारखा निष्ठावंत, विजयाची खात्री असणारा तगडा उमेदवार काँग्रेसकडे आहे; परंतु आमदार पाटील यांची लोकसभा लढवायची तयारी नाही. त्यांना सतेज पाटील यांनी लोकसभा लढवावी, असे वाटते. या दोघा मातब्बर उमेदवारांत तू..तू..-मैं..मैं.. असे सुरू आहे. या दोघांनी एकत्रित बसून ताकदीचा उमेदवार दिला आणि रान उठवले तर ही जागा जिंकणे काँग्रेसला अवघड नाही.काँग्रेसबद्दल सहानुभूती..शिवसेनेतील आणि आता राष्ट्रवादीतील फुटीनंतर काँग्रेसबद्दल जनमाणसांत पुन्हा सहानुभूती तयार होताना दिसत आहे. राष्ट्रवादीत फूट; परंतु पी.एन. आणि सतेज पाटील यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले. या पक्षाचा एकही आमदार फुटला नाही, याचेही कौतुक होताना दिसत आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेसला संधी आहे. फक्त या दोन नेत्यांनीच मनावर घेण्याची गरज आहे.

कोल्हापूर लोकसभेचे १९७१ पासूनचे खासदार१९७१ : राजाराम दादासाहेब निंबाळकर (काँग्रेस)१९७७ : दाजीबा बळवंतराव देसाई (शेकाप)१९८० : उदयसिंहराव गायकवाड (काँग्रेस)१९८४ : उदयसिंहराव गायकवाड (काँग्रेस)१९८९ : उदयसिंहराव गायकवाड (काँग्रेस)१९९१ : उदयसिंहराव गायकवाड (काँग्रेस)१९९६ : उदयसिंहराव गायकवाड (काँग्रेस)१९९८ : सदाशिवराव मंडलिक (काँग्रेस)१९९९ : सदाशिवराव मंडलिक (राष्ट्रवादी)२००४ : सदाशिवराव मंडलिक (राष्ट्रवादी)२००९ : सदाशिवराव मंडलिक (अपक्ष-काँग्रेस सहयोगी सदस्य)२०१४ : धनंजय महाडिक (राष्ट्रवादी)२०१९ : प्रा. संजय मंडलिक (शिवसेना)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभा