इचलकरंजीत इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:23 IST2020-12-22T04:23:37+5:302020-12-22T04:23:37+5:30
येथील मलाबादे चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. तेथून शहर काँग्रेस समिती ते प्रांत कार्यालय असा मोटारसायकल ढकलत मोर्चा काढला. ...

इचलकरंजीत इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा मोर्चा
येथील मलाबादे चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. तेथून शहर काँग्रेस समिती ते प्रांत कार्यालय असा मोटारसायकल ढकलत मोर्चा काढला. मोर्चा प्रांत कार्यालयावर पोहोचल्यानंतर सभेत रूपांतर झाले. तेथे केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. यावेळी अध्यक्ष संजय कांबळे, नगरसेवक राहुल खंजिरे, शशांक बावचकर यांची भाषणे झाली. वक्त्यांनी आपल्या भाषणात, अच्छे दिन'''' ची स्वप्ने दाखवून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल ९२, डिझेल ८०, तर गॅस ७०० रुपयांवर नेऊन ठेवला. ही अन्यायकारक दरवाढ असल्याने ताबडतोब मागे घ्यावी, अशी मागणी केली. आंदोलनात बाबासाहेब कोतवाल, शशिकांत देसाई, मुन्ना खलिफा, शेखर पाटील, आदींसह महिला व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
चौकटी
मोर्चात लक्षवेधी फलक
मोर्चामध्ये आंदोलकांनी गॅस टाकी, पेट्रोल पंप गन, अच्छे दिनची धमाका ऑफर असे लक्षवेधी फलक हातात घेऊन निषेध नोंदविला.
मोर्चासाठी आणल्या होत्या म्हशी
काही आंदोलकांनी मोर्चामध्ये सहभागी करण्यासाठी दोन म्हशी आणल्या होत्या; परंतु पोलीस खात्याने परवानगी नाकारल्याने त्यांना सहभागी केले नाही. मोर्चास्थळी मात्र त्याची चर्चा रंगली होती.
(फोटो ओळी)
२११२२०२०-आयसीएच-०२
इचलकरंजीत इंधन दरवाढीविरोधात शहर काँग्रेसच्यावतीने मलाबादे चौकातून प्रांत कार्यालयावर मोटारसायकल ढकलत मोर्चा काढला.
(छाया - उत्तम पाटील)