कोल्हापुरात कॉंग्रेसची धरणे, निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:55 IST2020-12-05T04:55:25+5:302020-12-05T04:55:25+5:30

कोल्हापूर : केंद्र शासनाने कृषी व शेतकरीसंदर्भात पारित केलेल्या कृषिविषयक कायद्याच्या विरोधात देशातील शेतकरीवर्ग निदर्शने व आंदोलन करीत असून ...

Congress protests in Kolhapur | कोल्हापुरात कॉंग्रेसची धरणे, निदर्शने

कोल्हापुरात कॉंग्रेसची धरणे, निदर्शने

कोल्हापूर : केंद्र शासनाने कृषी व शेतकरीसंदर्भात पारित केलेल्या कृषिविषयक कायद्याच्या विरोधात देशातील शेतकरीवर्ग निदर्शने व आंदोलन करीत असून या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रवेशद्वाराजवळ धरणे धरण्यात आले.

यावेळी केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरीसंदर्भात पारित केलेल्या कायद्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनात शहर अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, गुलाबराव घोरपडे, शारंगधर देशमुख, महिला अध्यक्ष संध्या घोटणे, जिल्हा सचिव संजय पोवार-वाईकर, भरत रसाळे, किशोर खानविलकर, महंमद शेख, संपत पाटील, सुरेशराव कुराडे, विक्रम जरग, ए. डी. गजगेश्वर, प्रदीप चव्हाण, प्रमोद बुलबुले, संग्राम गायकवाड, उज्ज्वला चौगले, हेमलता माने, पूजा आरडे, लीला धुमाळ, शुभांगी साखरे, प्रदीप शेलार, रणजित पोवार, रंगराव देवणे, तौफिक मुल्लानी, उमेश पोर्लेकर, मंगल खुडे, विश्वास नांगरे आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो क्रमांक - ०३१२२०२०-कोल-कॉग्रेस धरणे

ओळ - कोल्हापूर शहर जिल्हा कॉंग्रेस समितीच्यावतीने गुरुवारी केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले.

Web Title: Congress protests in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.