इचलकरंजीत कॉँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:54 IST2020-12-05T04:54:38+5:302020-12-05T04:54:38+5:30
इचलकरंजी : दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी उभारलेल्या आंदोलनाला गुरुवारी येथील कॉँग्रेसने धरणे आंदोलन करून पाठिंबा दिला. येथील कॉँग्रेस समितीसमोर जमलेल्या ...

इचलकरंजीत कॉँग्रेसची निदर्शने
इचलकरंजी : दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी उभारलेल्या आंदोलनाला गुरुवारी येथील कॉँग्रेसने धरणे आंदोलन करून पाठिंबा दिला. येथील कॉँग्रेस समितीसमोर जमलेल्या आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
केंद्र सरकारने केलेल्या काळ्या कायद्याविरोधात कॉँग्रेसच्यावतीने देशभर आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत हे कायदे मागे घेणार नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगितले. यावेळी नगरसेवक शशांक बावचकर, बाबासाहेब कोतवाल, प्रकाश कांबळे, विनायक यादव, संकेत वासुदेव, विद्या भोपळे, गजानन खामकर, आदी सहभागी झाले होते.
(फोटो ओळी)
०३१२२०२०-आयसीएच-०३
इचलकरंजीत कॉँग्रेस समितीसमोर आंदोलकांनी निदर्शने केली.
(छाया-उत्तम पाटील)