शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

congress kolhapur- इंधन, गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 17:13 IST

PetrolHike Congress Kolhapur : पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात येथील काँग्रेस कमिटीतर्फे सोमवारी निदर्शने करण्यात आली. येथील पार्वती टॉकीजजवळील शेतकरी संघाच्या पेट्रोल पंपासमोर ही निदर्शने झाली. माजी उपमहापौर संजय मोहिते यांनी क्रिकेटरच्या गणवेशात येत पेट्रोलच्या दराने सेंच्युरी पार केल्याकडे लक्ष वेधले. काँग्रेसचे नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

ठळक मुद्देइंधन, गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसची निदर्शनेफलक हातात घेऊन कार्यकर्त्यांनी वेधले लक्ष

कोल्हापूर : पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात येथील काँग्रेस कमिटीतर्फे सोमवारी निदर्शने करण्यात आली. येथील पार्वती टॉकीजजवळील शेतकरी संघाच्या पेट्रोल पंपासमोर ही निदर्शने झाली. माजी उपमहापौर संजय मोहिते यांनी क्रिकेटरच्या गणवेशात येत पेट्रोलच्या दराने सेंच्युरी पार केल्याकडे लक्ष वेधले. काँग्रेसचे नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.पेट्रोलने शंभरी पार केली आहे. डिझेलचे दरदेखील सातत्याने वाढत आहेत. गॅसचीही दरवाढ प्रचंड प्रमाणात झाली आहे. या दरवाढीविरोधात आक्रमक झालेल्या काँग्रेसने रस्त्यावर उतरत मोदी सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली. पालकमंत्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.

मोदी सरकार चले जाव, मोदी सरकार म्हणजे महागाईचा भस्मासूर असे फलक हातात घेऊन कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले. लुटेरी मोदी सरकार, पेट्रोल हुआ सौ पार, पेट्रोल महंगाई से जनता बेहाल, मोदी के पूंजीपती मित्र मालामाल, पेट्रोल, डिझेल शंभर पार, मोदी बस्स करा जनतेची लूटमार अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झालेत. सर्वसामान्य, गरीब आणि हातावरचे पोट असणाऱ्यांना दोनवेळचे जेवण मिळणेदेखील मुश्कील झाले आहे. अशा काळातच इंधन, गॅस दरवाढीचे संकट निर्माण झाले आहे. यामुळे मोदी सरकारने इंधन आणि गॅस दरवाढ मागे घ्यावी.निदर्शनावेळी माजी महापौर नीलोफर आजरेकर, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, संध्या घोटणे, सागर चव्हाण, सचिन चव्हाण, तौफिक मुल्लाणी, सुलोचना नायकवडे, संजय पवार-वाईकर, ॲड. गुलाबराव घोरपडे, बाळासाहेब सरनाईक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

टॅग्स :congressकाँग्रेसPetrolपेट्रोलkolhapurकोल्हापूर