शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
2
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
3
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
4
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
5
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
6
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
7
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
8
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
12
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
13
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
14
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
15
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
16
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
17
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
18
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
19
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
20
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 

काँग्रेस आघाडीच सत्तेच्या जवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2017 00:46 IST

जिल्हा परिषद : चंदगड आघाडीचाही पाठिंबा शक्य

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणात दोन्ही काँग्रेसची आघाडीच सत्तेच्या जवळ असल्याचे चित्र आज तरी दिसत आहे. भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असली तरी चंदगडच्या युवक क्रांती आघाडीच्या दोन जागा या राष्ट्रवादीसोबत राहणार असे संकेत आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच ‘त्यांना चाकोरी सोडून जायचे नाही,’ असे स्पष्ट शब्दांत बजावले असल्याचे समजते. त्यांना सहलीवर नेण्यामागे हाच दबाव असल्याची माहिती आहे.जिल्हा परिषदेत शिवसेनेकडे दहा जागांसह सत्तेच्या चाव्या असल्या तरी त्या पक्षाचाच ठोस असा निर्णय झालेला नाही. मुंबई पालिकेत काय होते यावर येथील निर्णय अपेक्षित होता. मुंबईत भाजपने जरी सत्तेतून अंग काढून घेतले असले तरी शिवसेनेने त्यास मनापासून ‘टाळी’ दिलेली नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करू, असे सांगितले आहे. मुंबईची महापौर निवड आज (बुधवारी) होत आहे. त्यानंतरही यातील घडामोडी वेग घेऊ शकतात; परंतु तरीही एकूण होरा पाहता ‘मुंबईत काही झाले तरी स्थानिक राजकारणात तुम्हाला सोयीची असेल अशी भूमिका घ्या,’ असाच निर्णय शिवसेनेकडून होण्याची शक्यता जास्त आहे.भाजप-जनसुराज्य व ताराराणी आघाडी अजूनही २५ वरच अडकली आहे. त्यातही चंदगड आघाडी बाजूला गेल्यास त्यांची संख्या दोनने कमी होते. शिवसेनेच्या दहा सदस्यांनी एकमुखी भाजपला पाठिंबा दिल्यास त्यांना उपाध्यक्षपद द्यावे लागेल. शिवसेनेत सर्वाधिक तीन सदस्य आमदार चंद्रदीप नरके यांच्या गटाचे आहेत. त्यांना हे पद देण्याचा प्रस्ताव आल्यास जनसुराज्य शक्तीचे नेते विनय कोरे हे मान्य करणार नाहीत. उपाध्यक्षपद कोरे यांच्या पक्षाला द्यायचे झाल्यास त्यास शिवसेनेतील आमदार नरके व आमदार सत्यजित पाटील यांचाही गट पाठिंबा देणार नाही, असे त्रांगडे झाले आहे. त्यामुळे नक्की काय होईल हे सांगणे अवघड होऊन बसले आहे.भाजपकडून अध्यक्षपदासाठी अरुण इंगवले यांचे नाव पुढे आले आहे; परंतु त्यांच्या जातीच्या दाखल्याबाबत तक्रार करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याबाबत संदिग्धता निर्माण झाल्यास शौमिका महाडिक यांचे नाव स्पर्धेत पुढे येऊ शकते. ‘सुरुवातीच्या टप्प्यात अध्यक्षपद खुले असताना महिलेला संधी कशाला’ अशी भूमिका माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी घेतली असली तरी ते गप्प बसलेले नाहीत. गेल्यावेळेला आमदार सतेज पाटील यांनी त्यांच्या मुलाला अध्यक्षपदाची संधी मिळू दिली नाही. त्यामुळे आता ते ही संधी सुनेसाठी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या तशा जोडण्या सुरू झाल्या आहेत. इंगवले यांच्यासाठी आमदार सुरेश हाळवणकर यांचा आग्रह आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचाही इंगवले यांच्या नावाला ‘ग्रीन सिग्नल’ आहे; परंतु दाखल्याचा विषय पुढे करून उगीच रिस्क नको, असा विचार झाल्यास चित्र बदलू शकते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची अशी ‘जोडणी’सद्य:स्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे त्यांचे स्वत:चे २५ सदस्य आहेत. त्याशिवाय आमदार प्रकाश आबिटकर-माजी आमदार दिनकरराव जाधव गटाचे दोन, माजी मंत्री प्रकाश आवाडे गटाचे दोन, शिंगणापुरातून विजयी झालेल्या अपक्ष रसिका पाटील असे तीस सदस्य होतात. त्यात चंदगड आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रत्येकी दोन सदस्यांचा पाठिंबा मिळाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी ३४ पर्यंत पोहोचते. एकदा सत्ता त्यांची येणार हे स्पष्ट झाल्यावर शिवसेनेतील काही सदस्यांचा पाठिंबा या आघाडीला मिळू शकतो, तशा हालचाली आहेत.सेनेचा निर्णय ११ला शक्यमुंबई महापौरपदाची निवड आज, बुधवारी असली, तरी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल शनिवारी (दि. ११) आहे. या निवडणुकांमध्ये भाजपला कितपत यश मिळते. हे पाहून शिवसेना महाराष्ट्रात कोल्हापूरसह अन्य जिल्हा परिषदांमधील सत्तेबाबत भाजपशी जमवून घ्यायचे की नाही हे ठरविण्याची शक्यता राजकीय अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.