शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

'मोदी सरकारने जनतेला महागाईच्या खाईत ढकले', आमदार पी. एन. पाटलांची भव्य पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 16:35 IST

मोदी सरकारने देशातील जनतेला महागाईच्या खाईत ढकलल्याचा घणाघाती आरोप आमदार पी. एन पाटील यांनी केला.

कोपार्डे : गेल्या ७० वर्षात काँग्रेसने सहकारी बँका, साखर कारखाने, बाजार समित्या, शिक्षण संस्था स्थापन करून खेडी व शेतकरी आर्थिक दृष्टीने समृद्ध केली. पण मोदी सरकारच्या काळात मोदीच्याच मंत्रीमंडळातील मंत्र्यांच्या मुलाने आंदोलक शेतकऱ्यांच्यावर गाडी घालून ठार मारले. शेतकरी काय मोदी सरकारचे वैरी होते काय? असा सवाल आमदार पी. एन पाटील यांनी उपस्थितीत करत मोदी सरकारने देशातील जनतेला महागाईच्या खाईत ढकलल्याचा घणाघाती आरोप केला.आज बीड शेड ते क। बीड दरम्यान करवीर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या महागाई विरोधातील पदयात्रानंतर झालेल्या जाहीर सभेत आमदार पाटील बोलत होते. यावेळी बंगळुरु मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याबद्दल निषेधाचा ठराव करण्यात आला. यावेळी गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल पाटील,पंचायत समिती उपसभापती अविनाश पाटील,राजेंद्र सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी आमदार पाटील म्हणाले, काँग्रेसच्या विरोधात महागाई बद्दल गरळ ओकणाऱ्या मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलचा दर १०० रूपयेच्यावर, घरगुती गँस एक हजार रुपये करून सर्वसामान्यांचे महागाईने कंबरडे मोडले आहे. शासकीय कंपन्या विकण्याचा धडाका लावला आहे. यावरून मोदी देश कोठे घेऊन गेले आहेत हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस सरकार आले तरच देश वाचणार असल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दररोज एक तास जनतेत प्रबोधन करावे असे आवाहन केले.यावेळी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, सरपंच सत्यजित पाटील यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcongressकाँग्रेसPandurang Patilपांडुरंग पाटील