शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
2
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
3
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
4
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
6
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
7
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
8
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
9
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
10
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
11
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
12
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
13
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
14
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
15
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
16
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
17
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
18
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
19
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
20
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...

Kolhapur: ‘गोकुळ’साठी ‘सतेज’ यांची तयारी, जास्त ठरावासाठी पायाला भिंगरी

By राजाराम लोंढे | Updated: June 24, 2025 17:33 IST

एकनिष्ठ नऊ संचालक ही मोठी ताकद

राजाराम लोंढेकोल्हापूर : ‘गोकुळ’ आगामी निवडणुकीसाठी महायुतीची मोट सध्या तरी भक्कम वाटत असली तरी आमदार सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून अत्यंत सूक्ष्मपणे बांधणी सुरू केली आहे. एकनिष्ठ नऊ संचालक ही त्यांची मोठी ताकद आहे. पहिल्या टप्प्यात ठराव जास्तीत जास्त कसे गोळा करता येतील यावर ते काम करत आहेत. आपल्यासोबत कोण येणार? याचा विचार करण्यापेक्षा त्यांनी जास्तीत जास्त ठराव महाविकास आघाडीकडे कसे जमा होतील, यावर भर दिला आहे. त्यामुळे, सध्या जरी ते एकाकी वाटत असले तरी प्रत्यक्ष रणांगणात त्यांच्यासोबत दिग्गज नेते राहतील अशा घडामोडी पडद्याआड सुरू आहेत. त्यामुळे आजच्या स्थितीला जे वरवर चित्र दिसते त्याहून वेगळ्याच दिशेला राजकारण नेणाऱ्या या घडामोडी आहेत.

राज्यातील सत्तेचा परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर होतोच. आताही तशीच परिस्थिती आहे. महायुती म्हणून सामोरे जाताना सतेज पाटील यांना एकटे पाडण्याची रणनीती विशेषत: भाजप नेत्यांची आहे. हे ओळखून त्यांनी ‘आपण एकटा पडलोय’ ही भावना दूध संस्था प्रतिनिधींच्या बैठकीत बोलून दाखवली. यावरून त्यांनी सहानुभूतीचे राजकारण सुरू केल्याची टीकाही झाली. मात्र, त्यांनी यातून आघाडीच्या नेत्यांना वेगळा संदेश दिला.महाविकास आघाडी म्हणून आता त्यांच्यासोबत खासदार शाहू छत्रपती हे सोबत राहणार आहेतच. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, संपतराव पवार, राजू आवळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार, संघाचे संचालक डॉ. चेतन नरके, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल देसाई, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, गोपाळराव पाटील आदींची साथ मिळणार आहे.

‘गोकुळ’चे पडसाद ‘केडीसीसी’त उमटणारमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘केडीसीसी’ बँकेच्या मागील दोन निवडणुका बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला, निवडणूक लागली असली तरी एकतर्फीच झाली होती. वित्तीय संस्थेची निवडणूक लागली की आरोप-प्रत्यारोप होतात, त्यातून संस्थेची प्रतिमा मलिन होऊन त्याचा परिणाम व्यवहारावर होतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीत ते बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करतात. ‘गोकुळ’नंतर अवघ्या सहा महिन्यांत बँकेची निवडणूक आहे. संघात सतेज पाटील यांना बाजूला केले तर ते बँकेला आव्हान देऊ शकतात? त्यामुळेच मंत्री मुश्रीफ यांची कोंडी होणार आहे.२०१५ ला निकराची झुंज..सतेज पाटील यांनी २०१५ ला येईल त्याला सोबत घेत ‘गोकुळ’ची निवडणूक लढवली होती. त्यांच्याकडे केवळ बाबासाहेब चौगले हे एकमेव संचालक होते, दूध संस्थांशी त्यांचा अजिबात संपर्क नसताना निकराची झुंज देत दोन जागा निवडून आणल्या होत्या. आता तर त्यांच्याकडे आठ विद्यमान संचालक आहेत, त्याचबरोबर चार वर्षे सत्तेत राहिल्याने त्यांचा संपर्क राहिल्याने महायुतीला वाटते तितकी सोपी निवडणूक नसणार, हे निश्चित आहे.

पी.एन. पाटील गटाची ताकद..गोकुळच्या राजकारणात काँग्रेसचे आमदार दिवंगत पी.एन. पाटील यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांना बळ दिले. पक्षीय बंध सोडून ते कायमच सत्तारूढ आघाडीसोबत राहिले. गोकुळच्या राजकारणात त्यांची एक ताकद राहिली. त्यांच्या निधनानंतर चिरंजीव राहुल पाटील यांना आमदार सतेज पाटील यांनी बळ दिल्याने ते गोकुळच्या निवडणुकीत सत्तारूढ आघाडीसोबतच आहेत. त्यामुळे सर्वाधिक ठराव असलेल्या करवीर तालुक्यात महाविकास आघाडी मजबूत होऊ शकते.

सतेज समर्थक संचालकविश्वास पाटील, बाबासाहेब चौगले, बयाजी शेळके, अंजना रेडेकर, शशिकांत पाटील चुयेकर, डॉ. चेतन नरके, बाळासाहेब खाडे, प्रकाश पाटील आणि स्वीकृत संचालक राजेंद्र मोरे (संभाव्य - अभिजित तायशेटे)