शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Congress Jan Sangharsh Yatra भाजप सरकारचे हजारो कोटींचे घोटाळे : पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 01:18 IST

इचलकरंजी : ईव्हीएम-मतदान यंत्रांमध्ये घोटाळे करून राज्या-राज्यांत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारची हजारो कोटी रुपयांची भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येत आहेत. जनतेला मोठमोठी स्वप्ने दाखवून सत्तेवर यावयाचे आणि मोठमोठ्या घोषणा करून जनतेची फसवणूक करावयाची, असा एकमेव कार्यक्रम मोदी सरकार करीत आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.राष्ट्रीय कॉँग्रेसच्यावतीने जनसंघर्ष यात्रेनिमित्त ...

ठळक मुद्देइचलकरंजीत जनसंघर्ष यात्रा सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

इचलकरंजी : ईव्हीएम-मतदान यंत्रांमध्ये घोटाळे करून राज्या-राज्यांत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारची हजारो कोटी रुपयांची भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येत आहेत. जनतेला मोठमोठी स्वप्ने दाखवून सत्तेवर यावयाचे आणि मोठमोठ्या घोषणा करून जनतेची फसवणूक करावयाची, असा एकमेव कार्यक्रम मोदी सरकार करीत आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

राष्ट्रीय कॉँग्रेसच्यावतीने जनसंघर्ष यात्रेनिमित्त आयोजित जाहीर सभेमध्ये चव्हाण बोलत होते. शनिवारी घोरपडे नाट्यगृह चौकातील सभेत वक्त्यांनी मोदी सरकार व राज्यातील फडणवीस सरकार यांच्या फसव्या कार्यपद्धतीवर घणाघाती टीका केली.भाषणात पृथ्वीराज चव्हाण यांनी, नोटाबंदी, जीएसटी, राफेल विमान खरेदी घोटाळा, आदी मुद्द्यांची माहिती दिली व ते म्हणाले, दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारची ‘मेक इन इंडिया’ योजना फोल ठरली आहे. यातून वेगवेगळ्या उद्योगधंद्यांत गुंतवणूक येण्याऐवजी देशातील छोटे-मोठे उद्योग बंद पडल्याने लाखोजणांचा रोजगार गेला.

प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी, मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलनकर्त्यांच्या इशाºयाला घाबरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूर येथे विठ्ठलाच्या पूजेला गेले नाहीत, म्हणून खिल्ली उडवली. अशा प्रकारे सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या फडणवीस सरकारला घरची वाट दाखवून निवडणुकीमध्ये महाराष्टÑात पुन्हा कॉँग्रेसलाच विजयी करा, असे आवाहन केले.

आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, फडणवीस हे फसवणीस मुख्यमंत्री आहेत. खोटे बोलून राज्य चालवितात. जनतेचा आता मोठा रोष निर्माण झाला आहे. हा जनसागर भाजपला अरबी समुद्रात बुडविल्याशिवाय राहणार नाही. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी, इचलकरंजीतील वस्त्रोद्योगासाठी विविध योजना खेचून आणल्या. त्या योजनांची वाट लावून हाळवणकर यांनी वस्त्रोद्योग मोडकळीस आणला. कारखानदार सध्या यंत्रमाग भंगारात विकायला लागले आहेत. शहरातील आयजीएम रुग्णालयाची वाट लावली. झोपडपट्टी, रेशन योजनेचा फज्जा उडविला. या सगळ्याचा विचार करून सध्या ‘करो या मरो’ची लढाई सुरू झाली आहे. यात जिंकलात, तर वाचलात, असे आवाहन केले.

सभेमध्ये शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी स्वागत व शशांक बावचकर यांनी सूत्रसंचालन केले. सभेसाठी प्रदेश महिला कॉँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस, आमदार डी. पी. सावंत, आमदार शरद रणपिसे, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री जयवंतराव आवळे, आदी उपस्थित होते.हाळवणकर यांच्यावर टीकाइचलकरंजीत वस्त्रोद्योगाची अधोगती झाली. गेल्या चार वर्षांत शहरात नवीन उद्योग सुरू झाले का ? याला कारणीभूत कोण? असा सवाल करत माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी नाव न घेता टीका केली. तर आमदार सतेज पाटील यांनी, दंगलीचा व लाटेचा फायदा घेऊन आमदार झालेल्या हाळवणकरांनी काय केले, असा प्रश्न विचारत गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असतानाही आयजीएम रुग्णालय बंद आहे. चारवेळा साखर वाटली, पण आजतागायत वीज बिल कमी झाले नाही. संपूर्ण वस्रोद्योगाचा व्यवसाय मोडीत काढण्याच्या मार्गावर आणून ठेवला आहे, अशी टीका केली.ज्येष्ठांनी एकत्रित राहून आम्हाला पाठबळ द्यावेजिल्ह्यातील ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे व जयवंतराव आवळे हे एकत्र आले असून, त्यांनी असेच एकत्रित राहून आम्हाला पाठबळ द्यावे. त्या पाठबळाच्या जोरावर आम्ही जिल्ह्यातील सर्व जागा जिंकून दाखवू, अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली.प्रकाश आवाडे तुम्ही प्रवेश परीक्षा पास झालातकॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी, सभेसाठी उपस्थित जनसमुदाय व रॅलीमध्ये सहभागी झालेले उत्स्फूर्त कार्यकर्ते त्याचबरोबर नियोजन पाहता तुम्ही प्रवेश परीक्षा पास झालात.आता निवडून येण्यापासूनही तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही,प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाने वस्त्रोद्योगाला ‘अच्छे दिन’ आले होतेमतदारसंघासाठी २४ तास झटणारे नेते असे स्तुती चव्हाण यांनी केली. 

टॅग्स :Congress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्राkolhapurकोल्हापूर