काँग्रेस कार्यालयात काँग्रेस स्थापना दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:22 IST2020-12-29T04:22:27+5:302020-12-29T04:22:27+5:30
कोल्हापूर : देशाच्या स्वतंत्र लढ्यामध्ये व त्यानंतर देशाच्या विकासासाठी योगदान दिलेल्या काँग्रेस पक्षाचा १३६वा स्थापना दिवस सोमवारी काँग्रेस पक्षाच्या ...

काँग्रेस कार्यालयात काँग्रेस स्थापना दिवस साजरा
कोल्हापूर : देशाच्या स्वतंत्र लढ्यामध्ये व त्यानंतर देशाच्या विकासासाठी योगदान दिलेल्या काँग्रेस पक्षाचा १३६वा स्थापना दिवस सोमवारी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष, मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार कोल्हापूर जिल्हा काँग्रेस समितीतर्फे या स्थापना दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार जयंत आसगांवकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, माजी महापौर निलोफर आजरेकर, बाळासाहेब सरनाईक, माजी आमदार दिनकरराव जाधव, गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, शामराव देसाई, हिंदुराव चौगुले, सुशील पाटील कौलवकर, विजयसिंह पाटील, शिवाजी कांबळे, तौफिक मुल्लाणी, संध्या घोटणे, सरलाताई पाटील, सुलोचना नायकवडी, वैशाली महाडिक, विक्रम जरग, संजय पाटील वाईकर उपस्थित होते.
ध्वजारोहण व राष्ट्रगीत झाल्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी जनतेचे प्रश्न जाणून घेतले. त्यांना भेटण्यासाठी काँग्रेस कार्यालयात मोठी गर्दी झाली होती.