काँग्रेसने लोककल्याणाची कामे केली : आमदार आवळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:29 IST2021-09-09T04:29:29+5:302021-09-09T04:29:29+5:30
वडगाव शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आमदार आवळे बोलत होते. अध्यक्षस्थानी काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण होते. आवळे म्हणाले, वडगावच्या विकासासाठी ...

काँग्रेसने लोककल्याणाची कामे केली : आमदार आवळे
वडगाव शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आमदार आवळे बोलत होते. अध्यक्षस्थानी काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण होते. आवळे म्हणाले, वडगावच्या विकासासाठी कटिबद्ध राहिलेलो आहे. माझा पहिलाच निधी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा सुशोभिकरणासाठी दिलेला आहे. आपण कार्यकर्त्यांनी लोकोपयोगी कामे सुचवावीत. ती प्राधान्याने करू. यावेळी वडगाव काँग्रेस उपाध्यक्ष पदी जावेद मुल्ला, गिरीधर पोवार, सरचिटणीस शंकर वासुदेव, अल्पसंख्याक शहराध्यक्ष जमीर शेख यांची निवड करण्यात आली. तालुकाध्यक्ष भगवान जाधव यांनी स्वागत केले. तर रामभाऊ लोकरे यांनी आभार मानले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष संभाजी माने, मकबूल मुल्ला, हिंदुराव पोवार, राहूल माने, धनाजी घोगरे, बाबू माने, राहूल खंडागळे, सुकुमार रावळ, कुमार शिंदे, शिवरूद्र पोवार आदी उपस्थित होते.