शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur North By Election Result: आजऱ्याच्या 'जयश्री'ने खेचून आणला 'विजयश्री'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 16:39 IST

जयश्री जाधव यांनी मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच घेतलेली आघाडी कायम राखत विजयश्री खेचून आणला. यानंतर कार्यकर्त्यांनी विजयी गुलाल उधळायला सुरुवात केली.

सदाशिव मोरेआजरा : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत आजऱ्याची कन्या असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी दणदणीत विजयी मिळवला. जयश्री जाधव यांनी मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच घेतलेली आघाडी कायम राखत विजयश्री खेचून आणला. यानंतर कार्यकर्त्यांनी विजयी गुलाल उधळायला सुरुवात केली. जयश्री जाधव या आजरा गावच्या असल्याने याठिकाणीही मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर याठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत जयश्री जाधव या विक्रमी मतांनी निवडून आल्या. माजी आमदार वसंतराव देसाई यांच्या नंतर जयश्री जाधव या आमदार झाल्या आहेत. जयश्री जाधव यांच्या विजयानंतर आजऱ्यात फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.प्रचारासाठी मित्रपरिवार व नातेवाईकांचा कोल्हापुरात ठाणजयश्री जाधव या डॉ. शंकरराव मोरे यांची कन्या व संतोष मोरे यांची बहीण आहेत. जोशी गल्लीमध्ये त्याचे वास्तव्य होते. बारावीनंतर त्यांचा चंद्रकांत जाधव यांच्याशी विवाह झाला. सध्या त्यांची माहेरची मंडळी सोमवार पेठेत वास्तव्यास आहेत. निवडणुकीत आजऱ्यातील टीम सतेज, राष्ट्रवादी, शिवसेना कार्यकर्ते, मित्रपरिवार व नातेवाईक प्रचारासाठी कोल्हापुरात ठाण मांडून होते. जयश्रींची विजयश्री खेचून आणणेसाठी आजरेकरांनी घरोघरी जाऊन प्रचार केला. उत्तर मतदारसंघात असणारे पाहुणे, मित्रमंडळी यांचेशी भेटून प्रचारात आजरेकरांनी प्रचारात आघाडी घेतली होती.विजयाची घोषणा होताच आतषबाजीजयश्री जाधव यांच्या विजयाची घोषणा होताच संभाजी चौक, शिवाजी पुतळा, भगवा चौकात फटाक्यांची आतषबाजी करणेत आली. यावेळी जि.प‌.उपाध्यक्ष जयवंत शिंपी, नगरसेवक किरण कांबळे, अभिषेक शिंपी, कारखान्याचे माजी संचालक आनंदा कुंभार, अमित खेडेकर यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकcongressकाँग्रेसkolhapur-north-acकोल्हापूर उत्तर