उपमुख्याध्यापक लाड यांचा निवृत्तीबद्दल सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:17 IST2021-07-11T04:17:31+5:302021-07-11T04:17:31+5:30
कोल्हापूर : येथील शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलचे उपमुख्याध्यापक बाळाराम लाड यांचा निवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला. उद्योजिका आणि संस्थेच्या ...

उपमुख्याध्यापक लाड यांचा निवृत्तीबद्दल सत्कार
कोल्हापूर : येथील शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलचे उपमुख्याध्यापक बाळाराम लाड यांचा निवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला. उद्योजिका आणि संस्थेच्या कार्याध्यक्ष पल्लवी कोरगांवकर यांच्याहस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार झाला. संस्थेच्या सहसचिव वंदना काशीद अध्यक्षस्थानी होत्या.
यावेळी कोरगांवकर म्हणाल्या, लाड यांनी निष्ठेने अध्यापनाचे काम केले. सरस्वतीची सेवा श्रेष्ठ असते हे त्यांनी दाखवून दिले. नवनिर्मितीचा ध्यास घेत त्यांनी अध्यापन केले. लाड यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सुरगोंडा पाटील, संजय सौंदलगे, रेखा शिंदे, आरती जोशी, राजेंद्र बनसोडे यांची भाषणे झाली. मुख्याध्यापक महावीर मुडबिद्रीकर यांनी स्वागत केले. सोनाली महाजन यांनी सू्त्रसंचालन केले. वृषाली कुलकर्णी यांनी आभार मानले.
फोटो ओळी - १००७२०२१-कोल- लाड सत्कार
कोल्हापुरातील शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलचे उपमुख्याध्यापक बाळाराम लाड यांचा सत्कार संस्थेच्या कार्याध्यक्ष पल्लवी कोरगांवकर यांच्याहस्ते झाले. यावेळी संतोष पोवार, वंदना काशीद, सिंधू लाड, वृषाली कुलकर्णी उपस्थित होते.