शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गर्भारपणात ‘झिका’ झाल्यास बाळास जन्मजात विकृती; कोल्हापुरात पाच गर्भवतींना झिकाची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 12:49 IST

कोल्हापूर : शहरातील गर्भवतींना झिकाची लागण होत आहे. आतापर्यंत नागाळा पार्क, कदमवाडी, विचारेमाळ, टेंबलाईवाडी, शाहू मिल कॉलनी या भागामध्ये ...

कोल्हापूर : शहरातील गर्भवतींना झिकाची लागण होत आहे. आतापर्यंत नागाळा पार्क, कदमवाडी, विचारेमाळ, टेंबलाईवाडी, शाहू मिल कॉलनी या भागामध्ये पाच गर्भवतींना याची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे महापालिका आरोग्य विभाग सतर्क झाला. बाधित परिसरात घर टू घर सर्वेक्षण केले जात आहे. आतापर्यंत शहरात ४ हजार ३२५ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये १२ हजार ३६० कंटेनरची तपासणी करण्यात आली. झिका हा आजार बहुतांश प्रमाणात एडीस जातीच्या संसर्गित डासाच्या चावण्याने पसरतो. हा डास दिवसा अधिक चावतो. आजार गर्भवती मातेकडून तिच्या गर्भाला होऊ शकतो. गर्भारपणामध्ये हा आजार झाल्यास बाळामध्ये जन्मापासून काही विकृती येण्याची शक्यता असते. अजूनपर्यंत झिका या आजारावर नेमके औषध किंवा लस उपलब्ध झालेली नाही. झिका विषाणूने संसर्गित आजार आहे. यामुळे शहरात गर्भवती महिलांना याची लागण गतीने होत आहे. यामुळे महापालिकेच्या ११ नागरी आरोग्य केंद्रातर्फे शहरातील गर्भवती महिलांचे सर्वेक्षण केले जात आहे. ४७६ गर्भवतींची तपासणी केली. त्यापैकी १० जणींना ताप असल्याचे आढळून आले. ४५७ गर्भवतींच्या रक्ताची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये पाच जणींना झिका झाल्याचे समोर आले आहे.

आजाराची लक्षणे अशी : ताप येणे, अंगावर पुरळ उमटणे, डोळे येणे, सांधे व स्नायूदुखी, थकवा आणि डोकेदुखी

प्रतिबंधात्मक उपाय : आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, परिसरात साचलेल्या निकामी, निरुपयोगी वस्तू नष्ट करून परिसर स्वच्छ करावा, डबकी बुजवून ती वाहती करावीत, इमारतीवरील तसेच जमिनीखालील पाण्याच्या टाक्यांना डासोत्पत्ती होऊ नये यासाठी घट्ट झाकण बसवावे. खिडक्यांना तसेच व्हेंट पाइपला डास प्रतिबंधक जाळ्या बसवाव्यात, डास उत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडावेत, एडीस डास दिवसा चावत असल्याने दिवसा झोपतानादेखील मच्छरदाणीचा वापर करावा.

लक्षणे असलेल्या संशयित तापाच्या रुग्णांनी महापालिकेच्या नजीकच्या दवाखान्याशी अथवा खासगी रुग्णालयाशी त्वरित संपर्क साधावा. सर्वेक्षणासाठी येणाऱ्या आशा वर्कर्स यांना सहकार्य करावे. -डॉ. प्रकाश पावरा, आरोग्य अधिकारी, महापालिका.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरZika Virusझिका वायरसPregnancyप्रेग्नंसी