आरोपींच्या अटकेसाठी नातेवाइकांचा ‘सीपीआर’मध्ये गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:30 IST2021-09-10T04:30:46+5:302021-09-10T04:30:46+5:30
कोल्हापूर : प्रेम प्रकरणातून सातवे (ता. पन्हाळा) येथील मोन्या ऊर्फ शिवतेज विनायक घाटगे (वय १८) या महाविद्यालयीन तरुणाला ...

आरोपींच्या अटकेसाठी नातेवाइकांचा ‘सीपीआर’मध्ये गोंधळ
कोल्हापूर : प्रेम प्रकरणातून सातवे (ता. पन्हाळा) येथील मोन्या ऊर्फ शिवतेज विनायक घाटगे (वय १८) या महाविद्यालयीन तरुणाला केलेल्या अमानुष मारहाणीनंतर गुरुवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सर्व संशयित आरोपींवर खुनाचा गुन्हा नोंदवून त्यांना त्वरित अटक करावी या मागणीसाठी नातेवाइकांनी गोंधळ घालून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आठ ते दहा तासांनी नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
सातवे (ता. पन्हाळा) येथील शिवतेज घाटगे याचा टेम्पो सावर्डे ते मांगले रोडवर हल्लेखोरांनी आडवून, मांगलेनजीकच्या धनटेक नावाच्या शेतात नेऊन विवस्त्र अवस्थेत काठ्यांनी अमानुषपणे मारहाण केली. नातेवाइकांनी गंभीर स्थितीत उपचारासाठी त्याला कोडोलीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. पहाटे त्याची प्रकृती बिघडल्याने कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात आणले; पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांनी नकार दिला. हल्लेखोरांवर खुनाचा गुन्हा नोंदवा, त्यांना त्वरित अटक करा, अशी मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. शिराळा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी नातेवाइकांना समजावण्याचा प्रयत्न केला. अखेर कोल्हापूर जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी येऊन नातेवाइकांची समजूत काढली. गुन्हेगारांवर खुनाचा गुन्हा नोंदवू, कारवाईत राजकीय हस्तक्षेप अगर पक्षपातीपणा होणार नाही याबाबत कोल्हापूर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगली पोलीस अधीक्षकांशी बोलून घेतल्याचे सांगितले. तपासात पोलिसांकडून सहकार्य राहील, असे आश्वासन दिल्यानंतर दुपारी नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
चिखलात माखलेला ‘शिवतेज’
हल्लेखोरांनी शेतात नेऊन विवस्त्र अवस्थेत शिवतेजला काठीने बेदम मारहाण केली. पावसाने शेतात चिखल झाल्याने तो चिखलाने माखलेल्या अवस्थेत बेशुद्धावस्थेत पडून होता, असे नातेवाइकांनी सांगितले. पोलीस ठाण्यांचा हद्दवाद व सहा. पोलीस निरीक्षक दिनेश काशीद यांचा पक्षपातीपणामुळे मारहाणीनंतर शिवतेजच्या नातेवाइकांनी कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश काशीद यांची भेट घेतली. त्यांनी गुन्हा मांगले हद्दीत घटना घडल्याने आपल्या पोलीस ठाण्याशी संबंध नसल्याचे सांगून हात झटकल्याचा आरोप मृत शिवतेजच्या नातेवाइकांनी केला. काशीद हे संशयित आरोपींसोबत जेवायला हॉटेलवर जात होते, त्यामुळे त्यांच्याकडून योग्यवेळी कारवाई न झाल्याने शिवतेजचा बळी गेल्याचा आरोपही नातेवाइकांनी केला. काशीद यांच्यावर कारवाईची मागणी केली.
फोटो नं. ०९०९२०२१-कोल-सातवे खून०१
ओळ : सातवे (ता. पन्हाळा) येथील शिवतेज घाटगे या तरुणाचा खून झाल्यानंतर आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी नातेवाइकांनी कोल्हापुरात सीपीआर आवारात गोंधळ घातला, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने त्यांची जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी समजूत काढली.
फोटो नं. ०९०९२०२१-कोल-शिवतेज घाटगे(खून)
090921\09kol_6_09092021_5.jpg~090921\09kol_7_09092021_5.jpg
ओळ : सातवे (ता. पन्हाळा) येथील शिवतेज घाटगे या तरुणाचा खून झाल्यानंतर आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी नातेवाईकांनी कोल्हापूरात सीपीआर आवारात गोंधळ घातला, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने त्यांची जिल्हा विशेष शाखेचे पो. नि. तानाजी सावंत यांनी समजूत काढली.फोटो नं. ०९०९२०२१-कोल-शिवतेज घाटगे(खून)~ओळ : सातवे (ता. पन्हाळा) येथील शिवतेज घाटगे या तरुणाचा खून झाल्यानंतर आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी नातेवाईकांनी कोल्हापूरात सीपीआर आवारात गोंधळ घातला, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने त्यांची जिल्हा विशेष शाखेचे पो. नि. तानाजी सावंत यांनी समजूत काढली.फोटो नं. ०९०९२०२१-कोल-शिवतेज घाटगे(खून)