शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

Kolhapur: कार्यक्रमात सत्कारमूर्तींच्याच कानशिलात लगावली, दोघी महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 13:00 IST

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कर्मचारीही गडबडून गेले

कळे : बाजारभोगाव ( ता. पन्हाळा ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरोप समारंभात दोघा महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये राडा झाला. सेवाकाळात प्राथमिक आरोग्य केंद्रात येण्यास टाळाटाळ करणाऱ्या महिला वैद्यकीय अधिकारी बदलीनिमित्त निरोप समारंभात वेळेत हजर राहिल्या. याचा दुसऱ्या वैद्यकीय महिला अधिकाऱ्यांना राग आला आणि त्यांनी जाब विचारताच शाब्दिक चकमक झाली. प्रकरण हातघाईवर गेल्यावर सत्कारमूर्तींच्याच कानशिलात लगावण्यात आली. इतर कर्मचाऱ्यांनी दोघींनाही बाजूला करत समजूत घातली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कर्मचारीही गडबडून गेले होते. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यापूर्वी वरिष्ठांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे अखेर माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला. मात्र, दिवसभर रुग्ण, कर्मचारी अन् नागरिकांमध्ये या राड्याची चर्चा रंगली होती.बाजारभोगाव (ता. पन्हाळा) येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची वर्ग १ व वर्ग २ अशी पदे आहेत. गेल्या चार वर्षांपासून या दोन्ही पदावर महिला अधिकारी कार्यरत होत्या. प्रमुख असणाऱ्या महिला अधिकाऱ्यांकडे गगनबावड्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्राचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. दोन वर्षापासून त्या प्रमुख असूनही बाजारभोगावला त्यांनी सेवा देण्याकडे दुर्लक्ष केले होते. गरजेच्या वेळीही त्या आल्या नाहीत. त्यामुळे सर्व भार वर्ग २ च्या पदावर कार्यरत असणाऱ्या महिला अधिकाऱ्यांवर पडला. आता या दोन्ही महिला अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. चार-पाच दिवसांपूर्वी वर्ग २ पदावर कार्यरत असणाऱ्या महिला अधिकाऱ्यांचा येथील कर्मचाऱ्यांनी निरोप समारंभ आयोजित केला होता, तर शुक्रवारी वर्ग १ पदावर कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. ही बातमी कर्मचाऱ्यांमार्फत समजताच वर्ग दोन पदावर काम केलेल्या वैद्यकीय अधिकारी हजर झाल्या. त्यांनी शुभेच्छा देण्याऐवजी शाब्दिक चकमक सुरू केली. वाद वाढत गेल्याने त्यांनी सत्कारमूर्तींच्या कानशिलात लगावली.याबाबत पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिला अधिकाऱ्यांची वरिष्ठांनी समजूत काढली. अखेर मारहाण केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माफी मागितल्याने या प्रकरणावर पडदा पडला. कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर या प्रकाराबाबत दुजोरा दिला असला तरी संबंधित वैद्यकिय अधिकाऱ्याने मात्र इन्कार केला आहे, तर दुसऱ्या महिला अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWomenमहिला