शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राधानगरी धरणाचा दरवाजा उघडला कसा..? कशी आहे व्यवस्था..कशी होते दुरुस्ती..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 12:47 IST

राधानगरी धरणाचा दरवाजा उघडला कसा याबद्दलच संभ्रम तयार झाला आहे. पाटबंधारे विभाग म्हणते की शॉर्ट सर्किटने वीज पंपाची मोटार जळाल्याने हे गेट उघडले तर हे गेट कुणीतरी उघडण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

कोल्हापूर : राधानगरीधरणाचा दरवाजा उघडला कसा याबद्दलच संभ्रम तयार झाला आहे. पाटबंधारे विभाग म्हणते की शॉर्ट सर्किटने वीज पंपाची मोटार जळाल्याने हे गेट उघडले तर हे गेट कुणीतरी उघडण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. याचा अर्थ हे गेट दुरुस्तीसाठी उघडण्यात आले नव्हते हे स्पष्टच आहे.

राजर्षि शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीतून आकारास आलेल्या या धरणामध्ये त्यावेळी वापरण्यात आलेले तंत्रज्ञान जगाच्या पुढे जाणारे होते. धोका पत्करूनच दुरुस्तीची कामे करावी लागतात. याबद्दल पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर म्हणाले, बुधवारी सकाळी ९.३० च्या सुमारास तीन सेवाद्वारांपैकी एक दार खुले होवून पाण्याचा विसर्ग सुुरु झाला. दरवाजा उघडण्यामागील कारण स्पष्ट झालेले नाही.

हे दार वीज पंपाच्या माध्यमातून उघडण्यात येते. त्याच्या स्टार्टरमध्ये बिघाड होवून ते खुले झाले असण्याची शक्यता आहे. किंवा अज्ञाताकडून अथवा धरण स्थळावर इतरत्र चालू असलेल्या कामावरील मजुराकडून अनवधानाने बटन दाबले गेल्याने उघडले असण्याची शक्यता आहे.

अशी आहे व्यवस्था...

  • या धरणाला पाणी सोडण्याच्या दोन व्यवस्था आहेत. धरण बांधतानाच त्यांची सोय केली आहे. पावसाळ्यात जेव्हा पाऊस प्रचंड येतो, धरण भरले की धरणातील पाण्याचा विसर्ग व्हावा यासाठी ७ स्वयंचलित दरवाजे आहेत. ते पाणी वाढले की आपोआप उघडतात व पाणी कमी झाले की आपोआप बंद होतात. 
  • दूसरी व्यवस्था ही शेतीला सिंचनासाठी पाणी पुरवण्यासाठी भोगावती नदीत पाणी सोडण्यासाठी आहे. ही एकूण ५ गेट आहेत. त्यातील १ व २ नंबरच्या गेटमधून वीज निर्मितीसाठी कायमपणे पाणी सोडण्यात येते. 
  • राहिलेल्या तीन गेटची पाटबंधारे विभागाची तांत्रिक शाखा वर्ष-दोन वर्षांतून दुरुस्ती करतो. हे काम मुख्यत: धरणातील पाणी कमी झाल्यावर साधारणत: मार्चनंतर करण्यात येते. एखाद्या गेटबध्दल दुरुस्ती करणे गरजेचे आहे असे वाटले तर ते पावसाळ्यानंतरही लगेच करण्यात येते. 

अशी होते दुरुस्ती..

  • या ५ ही गेट शिवाय दुरुस्तीवेळी वापरता यावे यासाठी धरणावर प्रचंड अशा आपत्कालीन गेटची सोय आहे. जेव्हा मुख्य गेटची दुरुस्ती करावी लागते तेव्हा पाण्याकडील बाजूस हे आपत्कालीन गेट पाण्यात सोडण्यात येते. ते गेट बसण्यासाठी तसा स्लॉटची व्यवस्था धरण बांधतानाच केली आहे. हे गेट सोडल्याशिवाय दुरुस्तीचे काम केले जात नाही. 
  • धरण तर भरलेले आहे आणि गेट दुरुस्त करायचे झाल्यास उपाय काय याचा विचार करून या आपत्कालीन गेटची सोय त्यावेळीच केली आहे. 
  • ही पाचही गेट कायमपणे पाण्यात असतात. त्यामुळे ती गंजतात. त्यांना ग्रिसींग करण्याची गरज असते. शटरचा दरवाजा जसा रोलरवर वर उघडत जातो, तशाच पध्दतीने साखळीच्या साहाय्याने व वीज पंपाच्या मदतीने हे गेट उघडण्यात येते व त्याची दुरुस्ती केली जाते. 

काळाच्या पुढे पाहणारे शाहू महाराज...

शाहू महाराज विलायतेत असताना त्यांना ब्रिटिश लोक संपत्तीच्या व शक्तीच्या प्रत्येक साधनाचा उपयोग समाजाच्या उत्थानासाठी किती चांगल्या पध्दतीने करतात हे शाहूंच्या मनांवर ठसले होते. त्यातूनच १९०७ च्या प्रारंभी त्यांनी जमिनीला पाणी पुरवठा करण्यासाठी ही राधानगरी धरणाची योजना तयार केली. बंधारा बांधण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात १९०९ मध्ये आईसाहेब महाराजांच्या हस्ते झाली. म्हणून या तलावाचे नावही लक्ष्मीबाई तलाव असे ठेवण्यात आले..हे धरण म्हणजे कोल्हापूरची जीवनदायिनी ठरले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरीDamधरण