वीज दर सवलत ऑनलाईन नोंदणीची अट रद्द करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:24 IST2021-05-13T04:24:18+5:302021-05-13T04:24:18+5:30
इचलकरंजी : यंत्रमागधारकांना वीज दर सवलत चालू राहण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची अट दिली होती, ती रद्द करावी. अथवा किमान एक ...

वीज दर सवलत ऑनलाईन नोंदणीची अट रद्द करावी
इचलकरंजी : यंत्रमागधारकांना वीज दर सवलत चालू राहण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची अट दिली होती, ती रद्द करावी. अथवा किमान एक वर्षाची मुदतवाढ द्यावी, अशा मागणीचे निवेदन पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना दिले.
निवेदनात, राज्यातील यंत्रमागधारकांना वीस वर्षांपासून वीज दरात सवलत मिळत आहे. ती यापुढेही चालू राहण्यासाठी ३१ मे २०२१ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी मुदत दिली होती. परंतु त्यामध्ये अनेक जाचक अटी असल्यामुळे तसेच विविध अडचणी येत असल्याने बहुतांश यंत्रमागधारकांना ऑनलाईन माहिती भरताना अडचणीचे ठरत आहे. दरम्यान, महावितरणकडे ५ अश्वशक्तीपासून ते १०० अश्वशक्तीपर्यंतची यंत्रमागासाठीची स्वतंत्र वर्गवारी असून, त्या वर्गवारीनुसार सवलत मिळत आहे. ती वस्त्रोद्योग विभागाकडून महावितरणकडे मागणी झाल्यास मिळू शकते, असे म्हटले आहे. दरम्यान, ३१ मेपर्यंत यंत्रमागधारकांनी ऑनलाईन नोंदणी करावी; अन्यथा वीजदरवाढीचा फटका बसेल. तरी नोंदणी करावी, असे आवाहन कोष्टी यांनी केले आहे.