शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना कालावधीतील वीज बिले हप्त्यांत भरण्याची सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 14:25 IST

mahavitran, bill, kolhapurnews कोरोनाच्या कालावधीतील वीज बिले भरण्यासाठी ग्राहकांना चालू वीज बिलासाठी तीन हप्त्यांची, तर याच कालावधीतील थकीत वीज बिले भरण्यासाठी १२ हप्त्यांची सवलत दिली जाणार आहे. ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणच्या कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांनी केले आहे.

ठळक मुद्देकोरोना कालावधीतील वीज बिले हप्त्यांत भरण्याची सवलतवीज ग्राहकांना लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन

कोल्हापूर : कोरोनाच्या कालावधीतील वीज बिले भरण्यासाठी ग्राहकांना चालू वीज बिलासाठी तीन हप्त्यांची, तर याच कालावधीतील थकीत वीज बिले भरण्यासाठी १२ हप्त्यांची सवलत दिली जाणार आहे. ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणच्याकोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांनी केले आहे.

कृषी ग्राहक वगळून सर्व उच्चदाब व लघुदाब वर्गवारीतील पात्र वीज ग्राहकांना योजनेचा लाभ घेता येईल. योजनेसाठी अर्ज सादर करताना ग्राहकांना थकबाकीच्या दोन टक्के रक्कम भरून २०० रुपयांच्या मुद्रांकावर विनाअट सहभागाचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल.थकबाकीतील ५० टक्के व्याज माफएकरकमी परतफेड योजनेत तात्पुरता व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांना थकबाकीवरील व्याजात ५० टक्के सूट व वीजपुरवठा खंडित कालावधीतील डिमांड आकारणी माफ होईल. याकरिता १०० टक्के मूळ थकबाकी व दंडाच्या रकमेसह थकबाकीवरील व्याजाची ५० टक्के रक्कम भरावी लागेल.तात्पुरता व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित थकबाकीदार ग्राहकांना एकरकमी परतफेड करता येईल किंवा पाच समान हप्त्यांत वीज बिले भरता येतील. मूळ थकबाकी, दंड व व्याजासह असलेली थकबाकीची ३० टक्के रक्कम भरणा केल्यास उर्वरित थकबाकी चालू वीज बिलासह पाच समान हप्त्यांत भरण्याची मुभा आहे. मात्र उर्वरित हप्त्याच्या रकमेवर वार्षिक १२ टक्के व्याज आकारणी होईल.कालमर्यादेत अर्ज निकालीसवलत योजनेतील ग्राहकांचे अर्ज कालमर्यादेत निकाली काढण्यात येणार आहेत. चालू वीज बिल प्रकरणी सात दिवसांच्या आत, तर तात्पुरता व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या थकबाकीदार ग्राहकांचे अर्ज १५ दिवसांत निकाली काढले जातील.पुनर्जोडणी प्रक्रिया१. तात्पुरता व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांना या योजनेत अर्जमंजुरीनंतर थकबाकीची ३० टक्के रक्कम व पुनर्जोडणी शुल्क भरल्यानंतर वीजजोडणी.२. सहा महिने कालावधीच्या आतील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांना तांत्रिक व्यवहार्यता तपासून जुन्याच ग्राहक क्रमांकाने वीजजोडणी.३. सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झालेला कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहक थकबाकीची ३० टक्के रक्कम भरल्यास नवीन वीज जोडणीसाठी पात्र. तांत्रिक व्यवहार्यता पडताळणीअंती नवीन वीजजोडणी शुल्काचा भरणा केल्यानंतरच वीजजोडणी देणार.

टॅग्स :mahavitaranमहावितरणbillबिलkolhapurकोल्हापूर