शाहूवाडीमध्ये कोविड लसीचा करणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:05 IST2021-02-05T07:05:29+5:302021-02-05T07:05:29+5:30

गेले दहा महिने कोरोना महामारीने सर्वांना ग्रासले होते . कोरोनाच्या या भीषण संकटात सर्वांनाच आधार देणारी ...

Comvid vaccination started in Shahuwadi | शाहूवाडीमध्ये कोविड लसीचा करणास प्रारंभ

शाहूवाडीमध्ये कोविड लसीचा करणास प्रारंभ

गेले दहा महिने कोरोना महामारीने सर्वांना ग्रासले होते . कोरोनाच्या या भीषण संकटात सर्वांनाच आधार देणारी व प्रतिबंधक लस आल्याने सर्वांनाच आधार मिळाला होता . शाहूवाडी तालुक्यात मलकापूर ग्रामीण रुग्णालय येथे या लसीचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समिती सभापती हंबीरराव पाटील ,जिल्हा परिषदेचे सदस्य व जिल्हा बँकेचे संचालक सर्जेराव पाटील पेरीडकर , जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे, यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला .

तालुका वैद्यकीय अधिकारी एच आर निरंकारी म्हणाले की

हा पहिला टप्पा असून या पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य विभागाचे यामध्ये शासकीय व खासगी सर्व अधिकारी, कर्मचारी त्याचबरोबर अंगणवाडीचे अधिकारी, सेविका , कर्मचारी यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण केले जाणार आहे . लसीकरणासाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात विशेष कक्ष सुरू करण्यात आला असून कोव्हिन ॲप द्वारे त्याची नोंदणी होत आहे. दररोज १०० लाभार्थींना लस दिली जाणार आहे . नोंदणी प्रसंगी संबंधित ओळखीसाठी आधार कार्ड अथवा पॅन कार्ड आवश्यक असणार आहे . त्याबरोबरच तत्काळ आलेल्या अंगणवाडी सेविका ,आरोग्य विभागाचे कर्मचारी यांची तत्काळ नोंदणी करून त्यांनाही लसीकरण केले जाणार आहे . याचा फायदा शासकीय कर्मचाऱ्यांनी घ्यावा . यावेळी पंचायत समिती सदस्य अमर खोत , वैद्यकीय अधीक्षिका डॉ एस. बी गायकवाड आदीसह नगरसेवक , वैद्यकीय अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Comvid vaccination started in Shahuwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.