जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लस देण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:07 IST2021-02-05T07:07:41+5:302021-02-05T07:07:41+5:30

कोविड प्रतिबंधक लस मोहिमेअंतर्गत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे दोन हजार लस उपलब्ध झाल्या आहेत. आरोग्य केंद्राच्यावतीने प्रथम सर्व डॉक्टर्स, ...

Comvid vaccination started at Jaisingpur Primary Health Center | जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लस देण्यास प्रारंभ

जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लस देण्यास प्रारंभ

कोविड प्रतिबंधक लस मोहिमेअंतर्गत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे दोन हजार लस उपलब्ध झाल्या आहेत. आरोग्य केंद्राच्यावतीने प्रथम सर्व डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, पालिका कर्मचारी याशिवाय ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरिकांना ही लस दिली जाणार आहे. ही लस पूर्णपणे मोफत असून, न घाबरता ही लस घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर यांनी केले आहे.

यावेळी नगराध्यक्षा डॉ. नीता माने, डॉ. पांडुरंग खटावकर, डॉ. अतिक पटेल, डॉ. अकलंक चौगुले, डॉ. अतुल घोडके यांच्यासह इतरांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली. याप्रसंगी जि. प. समाजकल्याण सभापती स्वाती सासणे, उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, संभाजी मोरे, राहुल बंडगर, दादा पाटील, डॉ. प्रसाद दातार, राजेंद्र झेले, अर्जुन देशमुख यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

फोटो - २५०१२०२१-जेएवाय-०२

फोटो ओळ - जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारपासून कोविड लस देण्यास प्रारंभ करण्यात आला.

Web Title: Comvid vaccination started at Jaisingpur Primary Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.