चंदगड ग्रामीण रुग्णालयात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:05 IST2021-02-05T07:05:01+5:302021-02-05T07:05:01+5:30

सर्वप्रथम तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर.के. खोत त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस.एस. साने यांनी कोविडची लस घेतली. त्याचबरोबर डॉ. ...

Comvid preventive vaccination started at Chandgad Rural Hospital | चंदगड ग्रामीण रुग्णालयात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ

चंदगड ग्रामीण रुग्णालयात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ

सर्वप्रथम तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर.के. खोत त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस.एस. साने यांनी कोविडची लस घेतली. त्याचबरोबर डॉ. सचिन गायकवाड व डॉ. एस.एम. हसुरे यांनीही लस घेतली. त्याचबरोबर आरोग्य कर्मचारी यांनाही लस देण्यात आली. यामध्ये चंदगड व कानूर आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स, नर्सेस, अंगणवाडीसेविका, आशासेविका, खासगी डॉक्टर्स अशा ६७ जणांना चंदगड ग्रामीण रुग्णालयात आज लस देण्यात आली. यापुढील काळात अन्य कर्मचारी व खासगी डॉक्टर्स व नर्सेस यांनाही पहिल्या टप्प्यात लस दिली जाणार आहे. यावेळी गटविकास अधिकारी चंद्रकांत बोंडरे, नगराध्यक्ष प्राची काणेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर.के. खोत, वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.एस. साने, डॉ. सचिन गायकवाड, डॉ. एस.एम. हसुरे, कार्यालय अधीक्षक श्री. कलेकर आदी स्टाॅफ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

फोटो ओळी:--- चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड प्रतिबंधक लस घेताना तालुका आरोग्याधिकारी डाॅ. आर. के. खोत. समवेत सभापती ॲड. कांबळे, नगराध्यक्षा सौ.काणेकर.

Web Title: Comvid preventive vaccination started at Chandgad Rural Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.