शहरं
Join us  
Trending Stories
1
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
2
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
3
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
4
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
5
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
6
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
7
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
8
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
9
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
10
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
11
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
12
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली
13
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
14
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
15
Navratri 2025: देवीचे वाहन सिंह आणि लक्ष्मीचे घुबड का? त्यामागे आहे महत्त्वपूर्ण कारण!
16
सोने-चांदीच्या दरात आज मोठी उलथापालथ; Gold झालं स्वस्त, पण चांदी अवाक्याच्या बाहेर
17
"पाकिस्तानचा संघ एवढा भारी आहे की..."; IND vs PAK FINAL आधी कर्णधार सलमानने भारताला डिवचले
18
VIRAL :'सोनार बनवणार नाही, चोर चोरणार नाही'! ट्रेनमध्ये विक्रेत्याचा शायराना अंदाज; तरुणाची स्टाईल पाहून पब्लिक झाली फॅन!
19
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
20
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?

कोल्हापुरात स्टाफ सिलेक्शन परीक्षेवेळी संगणक प्रणालीशी छेडछाड; हरयाणा, दिल्लीच्या तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 12:31 IST

परीक्षेमध्ये काहीजणांकडून पैसे घेऊन त्यांना उत्तीर्ण करण्यासाठीचा हा प्रकार होता का याची तपासणी आता पोलिस करत आहेत 

कोल्हापूर : स्टाफ सिलेक्शनच्यावतीने घेण्यात आलेल्या ‘कम्बाईनड ग्रॅज्युएट लेव्हल' अर्थात सीजीई परीक्षेवेळी संगणक प्रणालीत छेडछाड करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. यातील एक हरयाणामधील असून दोघे दिल्लीचे आहेत. या परीक्षेमध्ये काहीजणांकडून पैसे घेऊन त्यांना उत्तीर्ण करण्यासाठीचा हा प्रकार होता का याची तपासणी आता पोलिस करत आहेत. केंद्रीय मंत्रालयातील गट ‘ब’ आणि गट‘क’च्या अधिकाऱ्यांची भरती या परीक्षेव्दारे करण्यात येते. फुलेवाडी येथील कोतवालनगरमधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेल्या रविवारी ही परीक्षा घेण्यात येत होती. या ठिकाणी या तिघांनी तीन लॅपटॉप नेऊन परीक्षा हॉलमधील सर्व्हरची केबल लॅपटॉपना जोडली.

या कृत्याव्दारे संगणक नेटवर्क प्रणालीमध्ये छेडछाड करण्याचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर पांडुरंग गोविंद पाटील (वय ५७, रा. आपटेनगर, कोल्हापूर) यांनी याबाबत जुना राजवाडा पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल होऊन या तिघांनाही अटक करण्यात आली.अटक केलेल्यांमध्ये हर्ष राजेंद्र भारव्दाज (वय २१, रा. बहू अकबरपूर, ता. जि. रोहतक, हरयाणा), हर्ष राजेंद्रकुमार (२१, रा. शेरलिंग पार्क, सुलतानपुरी, नवी दिल्ली), अभिषेक संतोषकुमार प्रजापती (२१, बेगम विहार, बेगमपूर, नवी दिल्ली) यांचा समावेश आहे. गोविंद पाटील हे इडीकोटी कंपनीत व्हेन्यू मॅनेजर आहेत. केंद्र शासनाच्या विविध ऑनलाईन परीक्षा घेण्याचा ठेका या कंपनीकडे आहे. सीजीई २०२५ या परीक्षेसाठी दिल्ली येथील ठेकेदार मोहन शर्मा यांनी हे कॉम्प्युटर ऑपरेटर पुरवले आहेत. यातील तिघांनी हा कारभार केला असून पोलिस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटोळे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Staff Selection Exam Tampering; Three Arrested from Haryana, Delhi

Web Summary : Three individuals from Haryana and Delhi were arrested in Kolhapur for tampering with the computer system during a Staff Selection exam. They allegedly connected laptops to the server to manipulate the exam. Police are investigating if money was exchanged for passing marks.