रवळनाथ विद्यामंदिरला संगणक व प्रोजेक्टर सिस्टीम भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:17 IST2021-01-08T05:17:43+5:302021-01-08T05:17:43+5:30
आजरा : आजऱ्यातील रवळनाथ प्राथमिक विद्यामंदिरला पुणे येथील बेंटली फौंडेशनकडून संगणक व प्रोजेक्टर सिस्टीम भेट दिली आहे. गेल्या अनेक ...

रवळनाथ विद्यामंदिरला संगणक व प्रोजेक्टर सिस्टीम भेट
आजरा : आजऱ्यातील रवळनाथ प्राथमिक विद्यामंदिरला पुणे येथील बेंटली फौंडेशनकडून संगणक व प्रोजेक्टर सिस्टीम भेट दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बेंटली फौंडेशनचा हा उपक्रम सुरू आहे. विद्यार्थी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पारंगत व्हावा, हसत खेळत आनंदी शिक्षण मिळावे, शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, स्वयंअध्ययनाची सवय लागावी या हेतूने फौंडेशनचे संगणक सिस्टीमची भेट दिली आहे. जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक चराटी व सचिन रमेश कुरूणकर यांच्याकडे बेंटली सिस्टीमचे प्रतिनिधी तुषार शिंत्रे यांच्या हस्ते सदरचा सेट प्रदान करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या सिस्टीमचा निश्चितच फायदा होईल, असे अशोक चराटी यांनी सांगितले.
यावेळी उपाध्यक्ष विलास नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे, मुख्याध्यापिका शांता शिंत्रे, आजरा हायस्कूलचे मुख्याध्यापक शिवाजी येसणे, अशोक खोत, शंकर टोपले, अध्यापिका निलांबरी कांबळे, प्रतिभा बागुल, रेश्मा कुराडे, प्रवीण तेरसे, बबन कांबळे उपस्थित होते. निलांबरी कांबळे यांनी स्वागत केले. मुख्याध्यापिका शांता शिंत्रे यांनी आभार मानले.
फोटो ओळी : संगणक व प्रोजेक्टर सिस्टीम अशोक चराटी यांच्याकडे भेट देताना तुषार शिंत्रे. शेजारी मान्यवर.
क्रमांक : ०४०१२०२१-गड-०३