‘नटसम्राट’चे कोल्हापुरातील चित्रीकरण पूर्ण
By Admin | Updated: April 10, 2015 23:51 IST2015-04-10T21:47:55+5:302015-04-10T23:51:19+5:30
कोल्हापूर आवडते लोकेशन

‘नटसम्राट’चे कोल्हापुरातील चित्रीकरण पूर्ण
कोल्हापूर : वि. वा. शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’ कादंबरीवर आधारित ‘नटसम्राट’ या चित्रपटाचे कोल्हापुरातील चित्रीकरण शुक्रवारी पूर्ण झाले. गेल्या सात दिवसांपासून हे चित्रीकरण सुरू होते. इनक्राफ्ट फिल्मस प्रस्तुत या चित्रपटाचे विश्वास जोशी हे निर्माते आहेत. दिग्दर्शन महेश मांजरेकर यांचे आहे. त्यात अभिनेते विक्रम गोखले, नाना पाटेकर, अमित परब, अभिनेत्री नेहा पेंडसे, मृण्मयी देशपांडे, मेधा मांजरेकर व कोल्हापुरातील ज्येष्ठ अभिनेत्री शोभा शिराळकर, माधवी जाधव यांच्या भूमिका आहेत.
कर्नल गायकवाड यांचा वाडा व जनरल थोरात यांचा बंगला या दोन ठिकाणी चित्रपटाचे चित्रीकरण झाले. चित्रीकरणाचे सर्व व्यवस्थापन मिलिंद अष्टेकर यांनी केले. यानंतरचे पुढील चित्रीकरण पुण्यामध्ये होणार आहे.
कोल्हापूर आवडते लोकेशन
चित्रपटसृष्टीची परंपरा लाभलेल्या कोल्हापुरात आजही चित्रीकरणासाठी उत्तम लोकेशन्स आहेत. म्हणूनच महेश मांजरेकर कोल्हापूरला चित्रीकरणासाठी प्राधान्य देतात. त्यांच्या ‘शहाणपण देगा देवा’, ‘दे धक्का’ या चित्रपटांचेही चित्रीकरण कोल्हापुरातच झाले होते. नाना पाटेकर यांचे तर कोल्हापूरशी जिव्हाळ््याचे नाते आहे. चित्रीकरणादरम्यान त्यांनी जयप्रभा स्टुडिओ व शालिनी पॅलेसच्या स्थितीची आवर्जून चौकशी केली.