रस्ते वेळेत पूर्ण करा, नाही तर कारवाई

By Admin | Updated: January 14, 2015 00:40 IST2015-01-14T00:15:47+5:302015-01-14T00:40:34+5:30

विजयालक्ष्मी बिदरी : नगरोत्थान योजनेचा महापौरांकडून आढावा; ठेकेदारांना बजावले

Complete the road in time, if not the action | रस्ते वेळेत पूर्ण करा, नाही तर कारवाई

रस्ते वेळेत पूर्ण करा, नाही तर कारवाई

कोल्हापूर : नगरोत्थान योजनेतील शहरातील रस्ते विहीत वेळेत पूर्ण न केल्यास प्रत्येक दिवशी दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी आज, मंगळवारी दिला. शहरांतर्गत नगरोत्थान योजना व इतर शासकीय अनुदानातून करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या कामाचा आढावा महापौर तृप्ती माळवी यांनी घेतला. स्थायी समितीच्या सभागृहात पदाधिकारी, अधिकारी व ठेकेदार यांची संयुक्त बैठक सायंकाळी आयोजित करण्यात आली होती.
शिवाजी मार्केट अंतर्गत यु.व्ही.बी. इंजिनिअरिंगकडे सात रस्ते असून त्यापैकी सात रस्त्यांचे जी-१, जी-२ लेव्हलिंगचे काम पूर्ण झाले असून, इतर पाच रस्ते डांबरीकरणासाठी तयार आहेत. २४ जानेवारीपासून डांबरीकरणास प्रारंभ करण्यात येणार असल्याचे ठेकेदारांनी सांगितले. हे रस्ते विहीत वेळेत पूर्ण न केल्यास प्रत्येक दिवशी दहा हजार रुपये दंड करण्याच्या सूचना बिदरी यांनी दिल्या.
राजारामपुरी विभागीय कार्यालय अंतर्गत आर. ई. इन्फ्रा कंपनीकडे दहा रस्ते असून, यापैकी सहा रस्त्यांचे जी-१, जी-२, लेव्हलिंगचे काम पूर्ण झाले. या रस्त्याचे जी-१, जी-२ बाकी आहे. तसेच सर्व रस्त्यांचे एल.बी.एम., डी. बी. एम., व बी. सी. ही कामे अपूर्ण आहेत. राजारामपुरी मुख्य रस्ता, एस. टी. स्टँड रस्त्याचे स्ट्रॉम वॉटरचे काम सुरू आहे. २० जानेवारीपासून डांबरीकरणास प्रारंभ करण्यात येणार असल्याचे ठेकेदारांनी सांगितले.
ताराराणी मार्केट विभागीय अंतर्गत निर्माण कन्स्ट्रक्शनचे १६ रस्ते असून काही रस्त्यांचे स्ट्रॉम वॉटर सुरू आहे. २४ जानेवारीपासून डांबरीकरणास सुरुवात करणार आहे. हे रस्ते वेळेत पूर्ण न केल्यास प्रत्येक दिवशी दहा हजार रुपये दंड व स्ट्रॉम वॉटरचे कन्सल्टंट प्रायमो यांच्याकडे कर्मचारी कमी असल्याने त्यांना तातडीने अटी, शर्थीप्रमाणे आवश्यक कर्मचारी नेमण्याच्या सूचना बिदरी यांनी दिल्या. रस्त्याच्या दर्जाबाबत कोणत्याही प्रकारची हयगय झाल्यास संबंधित अभियंतांना जबाबदार धरण्यात येईल. पदाधिकारी कधीही कोणत्याही कामावर पाहणी करतील. यावेळी काही त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना महापौर माळवी यांनी दिल्या. या सर्व कामावर ठेकेदारांमार्फत बोर्ड लावून या कामकाजाचा कालावधी, काम सुरू व समाप्तीची तारीख, कामाची रक्कम व कामाचे स्पेसिफिकेशन याची नोंद बोर्डवर असावी. यावेळी उपमहापौर मोहन गोंजारे, स्थायी सभापती आदिल फरास, महिला व बालकल्याण सभापती लीला धुमाळ, नगरसेविका वंदना आयरेकर, प्रदीप उलपे, गटनेता शारंगधर देशमुख, नगरसेविका माधुरी नकाते, नगरसेवक सचिन चव्हाण, इंद्रजित सलगर, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, संजीव देशपांडे, एस. के.पाटील, जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी उपस्थित होते.

तर ठेकेदाराला दंड करणार
शिवपार्वती कन्स्ट्रक्शन यांच्याकडे आयसोलेशन हॉस्पिटल कमान ते नेहरुनगर ते गवत मंडई ते गोकुळ हॉटेल रस्त्याचे स्ट्रॉम वॉटरचे काम पूर्ण झाले असून, ते मार्च २०१५ पर्यंत रस्त्यावरील डांबरीकरण पूर्ण करण्यात येणार असल्याचे ठेकेदारांनी सांगितले. वेळेत काम पूर्ण न केल्यास प्रत्येक दिवशी एक लाख दंड व शिवपार्वती कन्स्ट्रक्शन कंपनीस दहा हजार रुपये दंडाच्या सूचना बिदरी यांनी दिल्या.

Web Title: Complete the road in time, if not the action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.