शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पॉलिहाऊस व शेडनेटधारक शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करावे- शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 11:42 IST

कोल्हापूर : पॉलिहाऊस व शेडनेटधारक शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, प्लास्टिक फुलांवर कायमस्वरूपी बंदी आणावी, शेतीमालास हमीभाव बाजारपेठ उपलब्ध ...

ठळक मुद्देपॉलिहाऊस व शेडनेटधारक शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करावेशेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन

कोल्हापूर : पॉलिहाऊस व शेडनेटधारक शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, प्लास्टिक फुलांवर कायमस्वरूपी बंदी आणावी, शेतीमालास हमीभाव बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, शेतीपूरक व्यवसायासाठीचे अनुदान ९० टक्के करण्यात यावे, यांसह विविध मागण्यांसाठी पॉलिहाऊस व शेडनेटधारक शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तरुण शेतकरी व महिला मोठ्या प्रमाणात पॉलिहाऊस शेतीकडे वळाल्या आहेत; मात्र गेल्या चार-पाच वर्षांत दुष्काळ, नोटाबंदी अशा विविध कारणांमुळे हे शेतकरी अडचणीत आले आहेत.

नुकताच ओला दुष्काळाचा सामना करावा लागला आहे; त्यामुळे कर्जासह व्याजाची परतफेड करणे शेतकऱ्यांना शक्य नाही. पॉलिहाऊस शेडनेटमधील जरबेरा, डच, गुलाब, कार्नेशन, कलर कॅप्सिकम, व अन्य भाजीपाल्याला हमीभाव नसल्याने व कृत्रिम फुलांमुळे कवडीमोल किंमत मिळत आहेत.वरील अडचणींचा विचार करून शासनाने कर्जमाफीसह यंदा अनुदानासाठीचा कालावधी वाढवून द्यावा, पुनर्लागवडीचा खर्च द्यावा, खते व कीटकनाशकांवरील कर माफ करावा, अनुदान नाकारलेल्या प्रकल्पांना तत्काळ मंजुरी द्यावी, विमा संरक्षणअंतर्गत त्वरित नुकसानभरपाई मिळावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. शिष्टमंडळात संघटना अध्यक्ष अ‍ॅड. माणिक शिंदे, राजश्री निंबाळकर, बाळासो शिंदे, विजय नाईक, रवींद्र वाळवेकर, प्रकाश कांबळे, सदानंद पाटील, सहदेव मिरजे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीFarmerशेतकरीkolhapurकोल्हापूर