शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: उपचारात हलगर्जीपणाची तक्रार; तीन तास मृतदेह पडून, सीपीआरमध्ये काही काळ तणाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 16:23 IST

सीपीआरमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांचा ठिय्या

कोल्हापूर : अपघात गंभीर जखमी झालेल्या रुग्णावर उपचार करण्यात हलगर्जीपणा केल्याची तक्रार करत सीपीआरमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी तीन तास ठिय्या मारला. मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. अखेर पोलिस आणि आरोग्यसेवक बंटी सावंत यांनी समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी शहिदा जहाँगीर नाकाडे (वय ५८, रा. तिसंगी, ता. गगनबावडा) यांचा मृतदेह स्वीकारला. ही घटना मंगळवारी (दि. ५) दुपारी घडली.सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, शहिदा नाकाडे या २६ जूनला तिसंगी येथे दुचाकीस्वाराच्या धडकेत जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्याचा सल्ला खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला. त्यानुसार नातेवाईकांनी मंगळवारी दुपारी शहिदा यांना सीपीआरच्या अपघात विभागात दाखल केले.मात्र, गर्दी असल्याने सुमारे अर्धा तास त्यांना बाहेरच स्ट्रेचरवर ठेवावा लागला. नातेवाईकांनी जबरदस्तीने त्यांना आत नेले. त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रुग्ण पोहोचताच त्याची तपासणी केली नाही. त्याला ऑक्सिजन देण्याची व्यवस्था केली नाही. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. गगनबावडा पंचायत समितीचे माजी सभापती बंकट थोडगे यांनी सीपीआरमधील जबाबदार अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी, असा आग्रह धरला.नातेवाईकांनी अपघात विभागासमोर ठिय्या मारल्याची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी धाव घेतली. आरोग्यसेवक बंटी सावंत आणि सहायक पोलिस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांनी समजूत घातल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारला. या घटनेमुळे सीपीआरमध्ये काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, गर्दीमुळे रुग्णावर उपचार करण्यास विलंब झाला असल्यास ड्युटीवर असलेले डॉक्टर, वॉर्डबॉय यांची चौकशी करू, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

ऑक्सिजनही तातडीने लावण्यात आला. महिनाभर खासगी रुग्णालयात असतानाच अतिशय गंभीर असलेला हा रुग्ण सीपीआरमध्ये आणल्यानंतर दगावला. परंतु सीपीआरच्या यंत्रणेकडून कोणताही हलगर्जीपणा झालेला नाही. - डॉ. राजेंद्र मदने, वैद्यकीय अधीक्षक, सीपीआर