देवस्थान समितीमधील भ्रष्टाचाराच्या तक्रारी द्या

By Admin | Updated: June 26, 2015 00:07 IST2015-06-26T00:07:06+5:302015-06-26T00:07:06+5:30

भ्रष्टाचाराच्या तपासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी नेमली आहे.

Complaint about corruption in the Devasthan committee | देवस्थान समितीमधील भ्रष्टाचाराच्या तक्रारी द्या

देवस्थान समितीमधील भ्रष्टाचाराच्या तक्रारी द्या

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमधील भ्रष्टाचार प्रकरणी तक्रारी दाखल करण्याचे आवाहन श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्र्यांनी या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी सीआयडी अंतर्गत ‘एसआयटी’ नेमली आहे. सध्या तपासाचे काम सुरू आहे.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमधील भ्रष्टाचाराच्या असंख्य तक्रारी या समितीकडे आल्या आहेत. देवस्थान समितीमध्ये अनेक प्रकारचे घोटाळे झाले आहेत, मात्र त्याबाबत तक्रारी देणे आवश्यक आहे. देवस्थान समितीमधील भ्रष्टाचार तसेच नियमबाह्य कामे झाली आहेत, असे वाटत असेल तर संबंधितांनी याबाबत कृती समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन मधुकर नाझरे व संभाजी साळुंखे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.(प्रतिनिधी)
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमधील भ्रष्टाचाराच्या तपासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी
नेमली आहे.

Web Title: Complaint about corruption in the Devasthan committee