शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

कोल्हापूर जिल्ह्यातील दोन हजार शेतकऱ्यांची गेल्या महापुरातील भरपाई अडकली, प्रशासनाकडे पैसे पडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 19:23 IST

त्रुटींमुळे अडकली रक्कम

कोल्हापूर : मागील वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम अजूनही जिल्ह्यातील २ हजार शेतकऱ्यांना मिळालेली नाही. या शेतकऱ्यांनी ई-केवायसी न केल्याने त्यांची ९९ लाख १८ हजार २१० इतकी रक्कम अजूनही जिल्हा प्रशासनाकडे आहे. यंदा मेमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. म्हणून लोकमतने गेल्यावर्षीच्या नुकसानीचे किती पैसे शेतकऱ्यांना मिळाले याची माहिती घेतली.मागील वर्षी अतिवृष्टीमुळे काेल्हापूर जिल्हा महापुराच्या उंबरठ्यावरून परतला असला तरी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर तातडीने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे नुकसान भरपाईची रक्कम थेट बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या खात्याची ई-केवायसी करून घेणे बंधनकारक केले आहे.मात्र अजूनही १ हजार ९९२ शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही किंवा त्यांच्या ई-केवायसीमध्ये त्रुटी आढळल्याने त्यांच्या खात्यावर रक्कम झालेली नाही. आता नव्या वर्षातील पावसाळा सुरू झाला. इथे आधीची रक्कम मिळायचा पत्ता नाही यावर्षी काय होणार या विचारानेच शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

म्हणून अडकली ई-केवायसीई-केवायसी म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याला आधार नंबरला जोडून घ्यायचे आहे. पण अजूनही अनेक शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया केलेली नाही. काही जणांचा आधार नंबर चुकला आहे तर काही जणांचे बँक खाते क्रमांक चुकले आहे. दुरुस्तीचे अर्ज देऊनही ते अपडेट झालेले नाही. अशा विविध कारणांमुळे ई-केवायसी योग्य झालेली नाही, ई-केवायसी नाही म्हणून रक्कम नाही असे हे त्रांगडे आहे.

दृष्टिक्षेपात नुकसान भरपाई..

  • बाधित शेतकरी : १ लाख ०८ हजार ८२९
  • जिल्ह्याला मिळालेली रक्कम : १२२ कोटी ४२ लाख ३७ हजार
  • मंजूर रक्कम : ९४ कोटी ५२ लाख १९ हजार ५३३
  • खात्यावर जमा झालेली रक्कम : ९१ कोटी ६८ लाख ८८ हजार ७६८
  • ई-केवायसी प्रलंबित शेतकरी : १ हजार ९९२
  • प्रलंबित रक्कम : ९९ लाख १८ हजार २१०
टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीfloodपूर