शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीच्या कर व्यवस्थापकाने चुकवला २१ कोटींचा जीएसटी, मुंबईतील मयांक पटेल यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 11:54 IST

ही कारवाई केंद्रीय जीएसटी विभागाच्या कोल्हापूर कार्यालयातील विशेष गुप्तचर पथकाने केली

कोल्हापूर : मुंबईतील वेलनेस हेल्थटेक कंपनीचा करप्रणाली व्यवस्थापक मयांक मुकेश पटेल (वय ३९, रा. डोंबिवली पश्चिम, ठाणे) याला २१ कोटी रुपयांची करचुकवेगिरी केल्याप्रकरणी केंद्रीय जीएसटीच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी अटक केली. कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयातील मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली. ही कारवाई केंद्रीय जीएसटी विभागाच्या कोल्हापूर कार्यालयातील विशेष गुप्तचर पथकाने केली.मुंबईतील विक्रोळी येथे वेलनेस हेल्थटेक कंपनीचे कार्यालय आहे. या कंपनीत मयांक पटेल हा करप्रणाली व्यवस्थापक पदावर काम करीत होता. या कंपनीकडून करचुकवेगिरी झाल्याची माहिती विशेष गुप्तचर पथकाला मिळाली होती. त्यानुसार कोल्हापूर कार्यालयातील पथकाने ११ सप्टेंबर २०२५ रोजी विक्रोळी येथे छापा टाकून कंपनीच्या कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी केली. त्यामध्ये करप्रणाली व्यवस्थापक पटेल याने कंपनीच्या कागदपत्रांद्वारे बनावट खरेदी-विक्री केल्याचे दाखवून आठ कोटी रुपये कर चुकवल्याचे निदर्शनास आले. तसेच त्याने स्वतःची एक कंपनी कागदोपत्री सुरू केली होती. त्या कंपनीकडून १३ कोटी रुपयांची करचुकवेगिरी झाल्याचे तपासणीत समोर आले. याबाबत गुप्तचर अधिकाऱ्यांनी पटेल याला नोटिस देऊन चौकशीसाठी कोल्हापूरला बोलावले होते. मंगळवारी त्याची अधिक चौकशी करून अटकेची कारवाई करण्यात आली. या गुन्ह्यात त्याच्या आणखी काही सहकाऱ्यांचा सहभाग असावा, अशी शक्यता तपास अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. त्यानुसार तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.सीपीआर रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आरोपी पटेल याची कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली. केंद्रीय जीएसटी विभागातील वरिष्ठ गुप्तचर अधिकारी सूरज पवार, अभिजित भिसे, सौरभ पवार यांच्यासह अमितकुमार जयस्वाल, अविनाश सूर्यवंशी आणि हिमांशू आहुजा यांच्या पथकाने ही कारवाई केली.