लैंगिक छळाच्या तक्रारींसाठी समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:25 IST2021-04-27T04:25:20+5:302021-04-27T04:25:20+5:30

कोल्हापूर : शासकीय, निमशासकीय तसेच खासगी कार्यालये, संघटना, बँका तसेच सर्वप्रकारच्या कार्यालयांमधील महिलांना लैंगिक छळाची तक्रार करण्यासाठी तक्रार ...

Committee for Sexual Harassment Complaints | लैंगिक छळाच्या तक्रारींसाठी समिती

लैंगिक छळाच्या तक्रारींसाठी समिती

कोल्हापूर : शासकीय, निमशासकीय तसेच खासगी कार्यालये, संघटना, बँका तसेच सर्वप्रकारच्या कार्यालयांमधील महिलांना लैंगिक छळाची तक्रार करण्यासाठी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात यावी व त्याचा अहवाल ३० तारखेपर्यंत सादर करावा, असे आवाहन जिल्हा महिला व ाबालविकास अधिकारी एस. डी. शिंदे यांनी केले आहे. काही तक्रार असल्यास महिलांनी सेक्सुयल हॅरॅशमेंट इलेक्ट्रॉनिक बॉक्स या ऑनलाईन तक्रार व्यवस्थापन प्रणालीवर आपली तक्रार नोंदवावी, असेही त्या म्हणाल्या.

शासकीय नियमानुसार प्रत्येक कार्यालयांमध्ये त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या आस्थापनांमध्ये तसेच खासगी संस्था, अशासकीय संघटना, सोसायटी ट्रस्ट, उत्पादक, पुरवठा, वितरण व विक्री यासह वाणिज्य, व्यावसायिक, शैक्षणिक, करमणूक, औद्योगिक, आरोग्य इत्यादी सेवा किंवा वित्तीय कामकाज पार पाडणारे युनिट किंवा सेवा पुरवठादार, रुग्णालय, सुश्रुषालये, क्रीडा संस्था अशा सर्वच कार्यालयांच्या ठिकाणी 'अंतर्गत तक्रार समिती’ स्थापन करून अध्यक्ष व सदस्यांच्या नावांचा फलक दर्शनीभागात लावणे बंधकारक आहे. असे न झाल्यास ५० हजार रुपये दंड आकारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Web Title: Committee for Sexual Harassment Complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.