शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

Kolhapur: काळम्मावाडी धरण गळतीची समितीने केली पाहणी, अध्यक्ष टी. एन. मुंडे यांनी दिली महत्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 16:10 IST

सोळांकुर : सिंचनावर कोणत्याही प्रकारचा परिणाम न होता काळम्मावाडी धरण गळती काम केले जाईल. गळतीमुळे धरणाला कोणत्याही प्रकारचा धोका ...

सोळांकुर : सिंचनावर कोणत्याही प्रकारचा परिणाम न होता काळम्मावाडी धरण गळती काम केले जाईल. गळतीमुळे धरणाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. त्यामुळे लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रतिबंधक उपाययोजना गठीत समितीचे अध्यक्ष टी. एन. मुंडे यांनी केले. मुंडे यांच्यासह समितीच्या सदस्यांनी मंगळवारी काळम्मावाडी धरण क्षेत्र परिसराची पाहणी केला. यावेळी ते बोलत होते.

मुंडे म्हणाले, धरणातील पाणी नैसर्गिकरीत्या जितके खोलवर जाणार तितके हे काम लवकर होणार आहे. टप्प्याटप्प्याने होणाऱ्या कामामुळे हे काम दोन वर्षांमध्ये पूर्ण होईल. जानेवारी २०२५ दरम्यान धरणाच्या गळतीच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. कामासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री व मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. या कामासाठी ८० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे.

धरणाच्या मुख्य भिंतीला एकूण नऊ दगडी खांब असून यापैकी चार, पाच आणि सात नंबरच्या खांबामधून गळतीचे प्रमाण अधिक आहे. काळम्मावाडी धरण हे २५.४० टीएमसीला पूर्ण क्षमतेने भरले जाते; पण धरणाच्या सुरक्षेसाठी चालू वर्षी २२ टीएमसी पाणीसाठा करण्यात आला होता. तरीही यावेळी धरणाच्या भिंतीतून जवळपास ३७० लिटर प्रतिसेकंद गळती चालू आहे. आजस्थितीला धरणामध्ये २० टीएमसी पाणीसाठा आहे. काम सुरू असताना समितीकडून वेळोवेळी पाहणी करण्यात येईल.यावेळी धरण गळती प्रतिबंधक उपाययोजना समितीचे सदस्य एच. व्ही. गुणाले, एस. एस. पगार, रिझवान अली, आर. एम. मोरे यांच्यासह कार्यकारी अभियंता अशोक पवार, स्मिता माने, अभियंता प्रशांत कांबळे, सहायक अभियंता विलास दावणे, प्रवीण पालकर, अधीक्षक अभियंता यांत्रिक जयवंत खाडे, कार्यकारी अभियंता बागेवाडी, अभियंता विजय राठोड, शाखा अभियंता नितीन भोजकर उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरण