शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: सीपीआर घोटाळयाच्या चौकशीसाठी समिती दाखल, शेंडा पार्कात कागदपत्रांची तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 19:08 IST

साखळीतील अधिकारी, कर्मचारी सुटता कामा नयेत

समीर देशपांडेकोल्हापूर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या येथील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालयाची खोट्या कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करून सव्वा चार कोटींचे टेंडर मिळवलेल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती कोल्हापुरात दाखल झाली असून गुरूवारी रात्री उशिरापर्यंत शेंडा पार्क येथे या प्रकरणातील कागदपत्रांची तपासणी करण्यात येत होती.ठेकेदार मयूर लिंबेकर याने मुलुंड येथील कामगार आरोग्य रूग्णालयाचे बोगस दरकरारपत्र दाखल करून याआधी ४ कोटी ६७ लाख रूपयांचे सर्जिकल साहित्य पुरवठा केले होते. या प्रकरणी त्याच्यावर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून तो दोन महिने फरारी आहे. याच प्रकरणाचा तपास करत असताना आता त्याने मुलुंड आणि वरळी कामगार रूग्णालयाची खोटी दरपत्रके सादर करून ४ कोटी २८ लाख रूपयांचे सर्जिकल साहित्य वितरित करण्याचे आणखी एक टेंडर मिळविले होते. त्यानुसार या दोन्ही आदेशांनुसार साहित्य वितरित करून बिलेही अदा करण्यात आली आहेत.पहिल्याप्रमाणेच दुसऱ्या प्रकरणामध्येही बोगस दरकरारपत्रे सादर केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने बुधवार दि. २५ जूनला प्रकाशित केले होते. त्याची तातडीने दखल घेत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी चौकशी समितीची स्थापना केली. सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली असून याच वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी मनोज दाभाडे हे या समितीचे सदस्य सचिव असून औषध निर्माता कमलेश निरंजन हे सदस्य आहेत.हे तिघेही गुरूवारी संध्याकाळी पाच वाजता शेंडा पार्क येथे आले. त्या ठिकाणी त्यांनी अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी चौकशीच्या कामाला सुरूवात केली आहे. या प्रकरणातील सर्व फाईल्स घेऊन त्यांनी सीपीआरचेे प्रशासकीय अधिकारी अजय गुजर यांना शेंडा पार्क येथे बोलावून घेतले. एका स्वतंत्र दालनामध्ये बसून या समितीने कागदपत्रांची छाननी रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवली हाेती.

साखळीतील अधिकारी, कर्मचारी सुटता कामा नयेतयाआधीच्या पावणे पाच कोटींच्या प्रकरणात फक्त लिंबेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करून वैद्यकीय शिक्षण विभागाने हात झटकले आहेत तसे न करता यामध्ये ज्याने फाईल तयार केलीे त्या लिपिकापासून शेवटची सही ज्याची होती त्या वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची गरज आहे. अन्यथा एकट्या लिंबेकरला जबाबदार धरून ही मधली भ्रष्ट साखळी नामानिराळी राहण्याची शक्यता आहे.