कळंबा : भाजप सरकारच्या काळात दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उपनगरांचा विकास झाला नाही, आता मात्र जास्तीत जास्त विकास निधी उपलब्ध करून देऊन उपनगरांच्या विकासास कटिबद्ध राहू, अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली.
प्रभाग क्रमांक ७६, साळोखेनगर येथे नगरसेविका प्रतीक्षा पाटील यांच्या पालिका विकास निधीमधून करण्यात येणाऱ्या पार्वती पार्क, ओपन जिम, हडको कॉलनी टर्फ मैदान आणि सुश्रूषा कॉलनीतील अंतर्गत रस्ते विकास कामांच्या प्रारंभाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगरसेविका प्रतीक्षा पाटील होत्या.
गेल्या पाच वर्षात जास्तीत जास्त विकासनिधी खेचून नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केल्याचे नगरसेविका प्रतीक्षा पाटील यांनी सांगितले. यावेळी राणोजी चव्हाण, संजय जेरे, गायत्री पाटील, उमा भोसले, लता पाटील आदी उपस्थित होते.
फोटो २८ कळंबा विकासकाम
प्रभाग ७६, साळोखेनगर येथे विविध विकास कामांच्या शुभारंभाप्रसंगी आमदार ऋतुराज पाटील, नगरसेविका प्रतीक्षा पाटील आदी उपस्थित होते.